हिवाळी अधिवेशनात नवा कायदा आणणार; लोकभावना लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय
मुंबई : राज्यातील देवस्थाने आणि मंदिरांच्या मालकीच्या भूखंडांबाबत राज्य सरकारने तयार केलेल्या 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायद्या'च्या प्रारूपाला चौफेर विरोधानंतर स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मंदिरांच्या जमिनींचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि या वादावर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात नवा कायदा आणला जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना केली.
मुंबई : आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक ...
- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर देशातील आघाडीचे ...
साडेचार लाख हेक्टर जमिनींचा तिढा
महाराष्ट्राची धार्मिक संस्कृती आणि देवस्थानांचे हित लक्षात घेऊनच या नव्या कायद्याचा मसुदा तयार केला जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागासह संपूर्ण राज्यातील साडेचार लाख हेक्टर देवस्थान इनाम जमिनींचा तिढा सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय न घेता, येत्या डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनात सर्व घटकांना न्याय देणारा आणि देवस्थानांचे संरक्षण करणारा नवा कायदा आणला जाईल, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.





