Dhule ACB Action : धुळे (Dhule) तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तथा शासकीय गोदाम व्यवस्थापकाला 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन बिल प्रक्रिया पुढे सरकवण्यासाठी शेतकऱ्याकडे लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली. मनिष महेश बागुल (वय 30) (Manish Mahesh Bagul) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज म्हणजेच गुरुवार ४ जून रोजी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक ...
MSP ज्वारी बिलासाठी 5 हजारांची लाच
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील अंचाडे (Anchade) गावातील एका शेतकऱ्याने आणि त्यांच्या पत्नीने स्वतःच्या शेतातील ज्वारी महाराष्ट्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी (Online registration) केली होती. नियमानुसार त्यांनी ज्वारीचा माल धुळे येथील शासकीय गोदामात जमा केला होता.
मात्र, ज्वारीची मोजणी झाल्यानंतर आणि पावत्या दिल्यानंतर पुरवठा निरीक्षक मनिष बागुल (Manish Mahesh Bagul) याने शेतकऱ्याला बाजूला बोलावून ज्वारीचा दर्जा चांगला दाखवण्यासाठी तसेच ऑनलाइन बिल प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. एवढंच नाही, तर पैसे न दिल्यास बिल प्रक्रिया रोखण्याची धमकीही दिल्याचं समोर आलं आहे.
Nashik : नाशिकमध्ये म्हाडा घोटाळ्याची (Mhada Scam) चर्चा सुरू असतानाच आता आणखी एका जमीन फसवणूक प्रकरणाने खळबळ उडवली आहे. एनए प्लॉट बनवून देण्याचे आमिष दाखवत ...
शेतकऱ्याकडून थेट ACB कार्यालयात तक्रार
शासकीय कामासाठी लाच देण्यास नकार देत संबंधित शेतकऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात (ACB) तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पंचांसमक्ष लाचेची मागणी झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शासकीय गोदामात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे शेतकरी पैसे देण्यासाठी गेल्यानंतर मनिष बागुल याने 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतलं. या प्रकरणी त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Anti-Corruption Act) धुळे शहर पोलीस ठाण्यात (Dhule City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी अडवणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
जळगाव : मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा आणि शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगाव शहरात (Jalgaon city) शिक्षकांसह १३ ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन
दरम्यान, शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तींकडून कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (Anti-Corruption Department) संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे. विभागाचा टोलफ्री क्रमांक १०६४ असून धुळे कार्यालयाचा (Dhule Office) व्हॉट्सअॅप क्रमांक ७७९८१६१०६४ आहे.






