Nashik : नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) निर्णायक पाऊल उचलले आहे. महापौर दालनात मंगळवारी बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके (Himgauri Aher-Adke) यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रस्ते दुरुस्तीची कामे दिवस-रात्र सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. (Nashik News)
मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने (Central Railway) एक अतिशय महत्त्वाचा आणि ...
दर्जेदार कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
तसेच शनिवार-रविवारीही कामात खंड पडू नये, गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये आणि सर्व रस्ते तातडीने वाहतुकीस योग्य करण्यावर भर देण्याचे आदेश दिले. बैठकीत शहरातील विविध भागांतील रस्त्यांची स्थिती, प्रलंबित कामे आणि उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेण्यात आला. कामांचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक यंत्रणा, मनुष्यबळ व संसाधने वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक बांधकाम साहित्य, यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा समन्वय साधून दर्जेदार कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. (Nashik News)
Jalgaon : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली–जळगाव दरम्यान पाचव्या रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत १२ ऑगस्ट रोजी ...
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कामांचा दर्जा राखा
रस्ते त्वरित वाहतुकीस योग्य करण्यासाठी जीएसबी, कोल्ड मिक्स, इंटरलॉकिंग पेव्हर ब्लॉक पॅचेस, कडक मुरूम व खडीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कामांचा दर्जा राखावा, असेही महापौरांनी स्पष्ट केले. बांधकाम विभागाने दररोज प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. (Nashik News)
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मंत्रालय परिसरात आंदोलन; काँग्रेसने जाहीर माफी मागण्याची मागणी मुंबई : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी ...
मंत्री महाजनांच्या मार्गदर्शनाखाली विशेष डेव्हलपमेंट प्लॅन
मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील कॉलनी रस्त्यांसाठी विशेष डेव्हलपमेंट प्लॅन (Special Development Plan) तयार करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या योजनेद्वारे कॉलनी रस्त्यांची दुरुस्ती, मजबुतीकरण आणि दीर्घकालीन विकासासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येणार असून, त्यादृष्टीने कामे हाती घेतली जाणार असल्याचे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितले. (Nashik News)
मुंबई उच्च न्यायालय; डीपफेक व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना निर्देश मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग ...
नाशिक महापालिकेने ११,६०९ खड्डे बुजवले
दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या वाढली असतानाही नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) युद्धपातळीवर दुरुस्ती मोहीम राबविली आहे. जून महिन्यापासून २९ जुलैपर्यंत ११,६०९ खड्डे बुजविण्यात आले असून, त्यानंतर अवघ्या चार दिवसांत (३० जुलै ते २ ऑगस्ट) आणखी २,५६८ खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असले, तरी नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) रस्ते दुरुस्तीची मोहीम अधिक वेगाने सुरू ठेवली आहे. प्रतिकूल हवामानातही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकांनी शहरभर युद्धपातळीवर काम करत १ जून ते २९ जुलै या कालावधीत तब्बल ११ हजार ६०९ खड्डे बुजविले आहेत. त्यानंतर केवळ ३० जुलै ते २ ऑगस्ट या चार दिवसांत आणखी २ हजार ५६८ खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली.






