Nashik : नाशिकमध्ये म्हाडा घोटाळ्याची (Mhada Scam) चर्चा सुरू असतानाच आता आणखी एका जमीन फसवणूक प्रकरणाने खळबळ उडवली आहे. एनए प्लॉट बनवून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप शहरातील नामांकित बिल्डर्स आणि विकासकांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) तब्बल ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. हेमंत सुरेश सातभाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मखमलाबाद शिवारातील वकीलनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या नियोजित ले-आउटमधील प्लॉट विक्रीत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, संशयितांनी एनए प्लॉट विकसित करून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले. सातभाई यांनी १९९८ मध्ये सभासदत्व घेत प्लॉट क्रमांक १२५ साठी संपूर्ण रक्कम भरली होती. त्यांना अलॉटमेंट लेटरही देण्यात आले. मात्र, त्यानंतर कायदेशीर खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणातून अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ...
सातभाई यांनी सन १९९८ मध्ये या सोसायटीचे सभासदत्व घेतले होते. संशयित बिल्डर्सच्या शुभशनी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने एन. प्लॉट विकसित करून देण्याचे आमिष दाखवले होते. यानंतर सातभाई यांनी प्लॉट नंबर १२५ (क्षेत्रफळ ३६० चौरस वार) साठी संपूर्ण रक्कम भरली आणि त्यांना लेटर ऑफ अलॉटमेंटदेखील देण्यात आले. परंतु, संशयितांनी (Suspected) कायदेशीर खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली.
सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
धक्कादायक बाब म्हणजे, फिर्यादीने पैसे भरलेला हाच प्लॉट संशयितांनी कथितपणे बनावट खरेदीखताद्वारे २४ डिसेंबर २०२० रोजी दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही, तर अशाच प्रकारे इतर अनेक सभासदांचीही फसवणूक झाल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी फसवणूक आणि एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. दरम्यान, अटक टाळण्यासाठी काही संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, अॅड. हेमंत सुरेश सातभाई (५३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Police ) संशयित जितेंद्र मनोहरदास ठक्कर, काश्मिरा राजेंद्र शहा, अनघा यशवंत गुजर, बाबूलाल मणिलाल शहा, राजेश बाबूलाल शहा, रोहित मणिलाल शहा, सुरेंद्र मणिलाल शहा, अश्विन गोवर्धनदास जसपरा, राजेंद्र रसिकलाल शहा आणि संस्थेचे पदाधिकारी शरद कुटे व भास्कर आनंदराव पवार अशा एकूण ११ जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमे आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम अन्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकमधील या नव्या जमीन घोटाळ्यामुळे बांधकाम व्यावसायिकांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.






