दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज; नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुण्यात कुरघोड्या
मुंबई : राज्यातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जागा आणि नागपूरमधील पोटनिवडणूक अशा एकूण १७ जागांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय नाट्य कमा
लीचे रंगले. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटून भाजप ११, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर लढणार असल्याचे निश्चित झाले असले, तरी प्रत्यक्ष अर्ज भरताना मित्रपक्षांनीच एकमेकांच्या जागांवर शड्डू ठोकल्याने महायुतीसमोर बंडखोरी थोपवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती अशा महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्येच एकमेकांवर कुरघोड्या सुरू असल्याचे चित्र सोमवारी दिसले.
Share Market Crash : शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे तब्बल ३.७५ लाख कोटी रुपये बुडाले
मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला दमदार तेजीने सुरुवात करणाऱ्या भारतीय शेअर बाजारात दिवसअखेरीस मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक पातळीवरील वाढत्या ...
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे या जागा रिक्त होत्या. अखेर एकूण मतदार संख्येच्या ७५ टक्के कोटा उपलब्ध असल्याने या जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुसफूस चव्हाट्यावर आली. कोकण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला, तर ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र, उर्वरित बहुतांश जागांवर महायुती अंतर्गत बंडाचे निशाण फडकत असल्याचे दिसून आले.
IPL 2026 Virat Kohli : आरसीबीच्या दुसऱ्या विजेतेपदानंतर विराट कोहलीची भावूक पोस्ट चर्चेत
नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने शानदार कामगिरी करत आयपीएल २०२६ चे विजेतेपद पटकावले. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली, आरसीबीने अंतिम सामन्यात ...
अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री नितेश राणे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, महेंद्र थोरवे, योगेश निकम, निरंजन डावखरे, प्रमोद जठार उपस्थित होते. तर, रवींद्र फाटक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
पुण्यात रंगला हायव्होल्टेज ड्रामा
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यानंतर तिथे पक्षांतर्गत मोठा पेच निर्माण झाला होता. माजी आमदार आणि दिवंगत अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे सुनील टिंगरे यांच्यासाठी पक्षातील आमदारांची मोठी फळी आग्रही होती. सुनेत्रा पवार यांच्या 'जिजाई' बंगल्यावर यासाठी आमदारांची बैठकही पार पडली. मात्र, या सर्व प्रक्रियेत पार्थ पवार यांचा शब्द अंतिम ठरल्याचे पाहायला मिळाले. पार्थ पवारांचे बालमित्र आणि माजी खासदार सं
जय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांनी ऐनवेळी वडील संजय काकडेंसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि पक्षाची उमेदवारी पदरात पाडून घेतली. पक्षासाठी योगदान देणाऱ्या टिंगरेंना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्या काकडेंना उमेदवारी दिल्याने अजितदादांच्या जुन्या निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
NEET Paper Leak P V Kulkarni : NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! कथित सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णीच्या बीडमधील चार मजली इमारतीवर हातोडा
बीड : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असताना आता प्रशासनाने कथित मुख्य सूत्रधार म्हणून चर्चेत असलेल्या सेवानिवृत्त ...
">
NEET Paper Leak P V Kulkarni : NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! कथित सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णीच्या बीडमधील चार मजली इमारतीवर हातोडा
बीड : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असताना आता प्रशासनाने कथित मुख्य सूत्रधार म्हणून चर्चेत असलेल्या सेवानिवृत्त ...
" class="section-post-content-internal-post-title">NEET Paper Leak P V Kulkarni : NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! कथित सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णीच्या बीडमधील चार मजली इमारतीवर हातोडा
बीड : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असताना आता प्रशासनाने कथित मुख्य सूत्रधार म्हणून चर्चेत असलेल्या सेवानिवृत्त ...