घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सोमेश्वर चौगुले आणि पोलीस उपनिरीक्षक गागरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली. त्यानंतर महिलेला उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती दिली असून सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे पोलीस आणि नागरिक यांच्या समन्वयाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या बचावकार्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अनेकांनी पोलीस कॉन्स्टेबल जयेश माळी यांच्या तत्परतेचे आणि धाडसाचे अभिनंदन केले आहे. मरीन ड्राइव्हसारख्या गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नियमित गस्त किती महत्त्वाची आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.🔶 Swift action & impressive coordination helps save the life of a 46 y/o woman. When a woman jumped into the sea at Marine Drive, PC Shri Jayesh Mali did not hesitate. With the help of nearby citizens, he acted swiftly and brought her safely to shore. API Shri Someshwar… pic.twitter.com/89QlAajov3
— मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) June 1, 2026






