मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीला दमदार तेजीने सुरुवात करणाऱ्या भारतीय शेअर बाजारात दिवसअखेरीस मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक पातळीवरील वाढत्या भू-राजकीय तणावाचा परिणाम बाजारावर दिसून आला असून सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टी २३,४०० च्या खाली घसरून बंद झाला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ३.७५ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. (Share Market Crash)
मागील आठवड्यापासून आपण निफ्टीमधील दिग्गज कंपन्यांची माहिती घेणार आहोत. मागील लेखात आपण टीसीएस बद्दल जाणून घेतले. आता आजची कंपनी आहे रिलायन्स ...
दिवसभरातील व्यवहारात बीएसई सेन्सेक्सने सुरुवातीला चांगली कामगिरी करत ७५,३६७ अंकांचा उच्चांक गाठला होता. मात्र नंतर विक्रीचा दबाव वाढल्याने निर्देशांक घसरला आणि अखेरीस ५०८ अंकांच्या घसरणीसह ७४,२६७.३४ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी ५० निर्देशांकही २३,७३३ अंकांपर्यंत पोहोचल्यानंतर घसरला आणि १६५.१५ अंकांच्या तोट्यासह २३,३८३.६० अंकांवर स्थिरावला. (Share Market Crash)
क्षेत्रनिहाय पाहता, आयटी क्षेत्राने बाजाराला काहीसा आधार देण्याचा प्रयत्न केला. टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि टीसीएस यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. मात्र इतर बहुतांश क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव कायम राहिला. एफएमसीजी निर्देशांकात सुमारे २.५ टक्क्यांची घसरण झाली, तर ऑटो, पीएसयू बँक आणि रिअल्टी क्षेत्रात २ टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेली. बँकिंग क्षेत्रातील निर्देशांकही जवळपास १ टक्क्यांनी खाली आला. (Share Market Crash)
भारताने २०४७ पर्यंत शंभर गिगावॅट अणुऊर्जा क्षमता उभारण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले आहे; मात्र हे लक्ष्य गाठण्यासाठी केवळ राजकीय ...
सेन्सेक्समधील ३० प्रमुख कंपन्यांपैकी केवळ ६ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले, तर २४ कंपन्यांमध्ये घसरण झाली. एचयूएल, आयटीसी आणि एनटीपीसी यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवली गेली. (Share Market Crash)
नवी दिल्ली : देशाच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात वाढ नोंदवण्यात आली आहे. मे महिन्यात जीएसटी महसूल संकलन ३.२ टक्क्यांनी वाढून १.९४ लाख कोटी ...
तज्ज्ञांच्या मते, जागतिक राजकीय घडामोडी, कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आणि परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका यावर आगामी काही दिवसांत बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगून दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. (Share Market Crash)






