मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे व्याही तसेच नागपूरातील प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी (Arun Lakhani) यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपने जाहीर केलेल्या ११ उमेदवारांच्या यादीत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून लखानी यांना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी जवळीक :
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare ) यांच्या पदांचा ...
अरुण लखानी यांनी मानले भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार :
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अरुण लखानी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. "मतदार योग्य उमेदवाराची निवड करतील, मी तातडीने प्रचाराला सुरुवात करणार आहे," असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन (Nitin Navin), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे विशेष आभार मानले.
विशेष म्हणजे, अरुण लखानी यांच्या कुटुंबासाठी हा काळ आनंदाचा ठरत आहे. त्यांचे सुपुत्र सारंग लखानी आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह लवकरच होणार आहे. त्यामुळे एका बाजूला राजकीय क्षेत्रातील महत्त्वाची संधी आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातील मंगलकार्य अशा दुहेरी आनंदाचा क्षण लखानी कुटुंब अनुभवत आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या डिजिटल पायाभूत सुविधांना मोठी चालना देणारी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ...
सुप्रिया सुळे यांच्याकडून अभिनंदन :
अरुण लखानी यांच्या उमेदवारीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांचे अभिनंदन केले. अलीकडेच अरुण लखानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सारंग आणि रेवती यांच्या विवाहाचे निमंत्रण दिले होते. यावेळी लखानी कुटुंबीयांसह रेवती सुळे आणि सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या भेटीचे फोटो आणि चर्चा त्यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.





