Monday, June 1, 2026

NEET Paper Leak P V Kulkarni : NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! कथित सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णीच्या बीडमधील चार मजली इमारतीवर हातोडा

NEET Paper Leak P V Kulkarni : NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! कथित सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णीच्या बीडमधील चार मजली इमारतीवर हातोडा

बीड : देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असताना आता प्रशासनाने कथित मुख्य सूत्रधार म्हणून चर्चेत असलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी (P. V. Kulkarni) यांच्या बीडमधील बांधकामावर कारवाई सुरू केली आहे. शहरातील शाहूनगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या चार मजली इमारतीचे पाडकाम सुरू करण्यात आले असून या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (NEET Paper Leak P V Kulkarni)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकामाबाबत नगरपालिकेने यापूर्वी नोटीस बजावत बांधकामातील कथित अनियमितता आणि परवानगीसंदर्भातील बाबींवर स्पष्टीकरण मागितले होते. तसेच ठराविक मुदतीत संबंधित ठेकेदाराने स्वतःहून बांधकाम हटवावे, असे निर्देशही देण्यात आले होते. नोटिशीची मुदत संपल्यानंतर अखेर या इमारतीवर पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आली. (NEET Paper Leak P V Kulkarni)

विशेष म्हणजे, प्रशासनाच्या देखरेखीखाली संबंधित ठेकेदाराकडूनच बांधकामाचा काही भाग हटविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू असताना त्यातील कथित अनधिकृत भागावर हातोडा चालवण्यात येत आहे. (NEET Paper Leak P V Kulkarni)

दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर आणि बीड येथे व्यापक तपास मोहीम राबवली आहे. या प्रकरणात अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून काही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (NEET Paper Leak P V Kulkarni)

तपासादरम्यान प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, प्रा. शिवराज मोटेगावकर आणि इतर काही संशयितांमधील संबंधांबाबत चौकशी सुरू आहे. लातूरमधील काही खासगी प्रशिक्षण वर्ग, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देणाऱ्या बॅचेसबाबतही तपास यंत्रणा माहिती गोळा करत आहेत. (NEET Paper Leak P V Kulkarni)

CBI च्या तपासात कुलकर्णी यांचे काही संशयितांशी संपर्क असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. कुलकर्णी हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून त्यांनी सेवानिवृत्तीनंतर लातूर आणि पुणे परिसरात वास्तव्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. (NEET Paper Leak P V Kulkarni)

NEET परीक्षेशी संबंधित या कथित गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. आता बीडमधील बांधकामावरील कारवाईनंतर या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले असून पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (NEET Paper Leak P V Kulkarni)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >