आतापर्यंत ८७ हजार २३९ अर्ज, तर ६१,१५३ अनामत रक्कमेसह अर्ज दाखल
मुंबई : म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारपर्यंतच आहे. यामुळे या घरांसाठी अर्ज करण्यासाठी ही अखेरची संधी आहे. बुधवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत २६४० घरांसाठी ८७ हजार २३९ जणांनी अर्ज भरले आहेत. मात्र यातील केवळ ६१ हजार १५३ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. अनामत रक्कमेसह सादर होणारे अर्जच सोडतीत सहभागी होतात. त्यामुळे २९ मे रोजी शेवटच्या क्षणापर्यंत किती अर्ज सादर होतात याकडे अर्जदारांसह म्हाडाचे लक्ष लागले आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगर, बोरिवली, गोरेगाव, मालाड, मालवणी, जुहू, अंधेरी, वांद्रे, दादर, ताडदेव यासह अन्य काही ठिकाणच्या २६४० घरांसाठी मुंबई मंडळाकडून मार्चमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर ३० मार्चपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. वेळापत्रकानुसार १५ मे रोजी सोडत काढली जाणार होती. मात्र सोडतीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मंडळाने नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली. परिणामी १५ मेची सोडत ५ जूनवर गेली. पहिल्या मुदतवाढीनुसार १५ मे रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपुष्टात येणार म्हटताच दोन दिवस आधी मंडळाने पुन्हा, दुसऱ्यांदा अर्जविक्री-स्वीकृतीस २९ मेपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे ५ जूनची सोडतही पुढे गेली. अद्याप सोडतीची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र जूनमध्येच सोडत काढली जाणार आहे. तर दुसऱ्या मुदतवाढीनुसार आता अर्ज भरण्यासाठी केवळ काही तास शिल्लक आहेत. गुरुवारी रात्री ११.५९ वाजता अर्ज भरण्याची प्रक्रिया संपुष्टात येणार आहे. तर अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत शुक्रवारी संपणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तातडीने अर्ज भरणे आणि अनामत रक्कमेसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : व्हिएतनाममधील दा नांग येथे पार पडलेल्या २३ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय पुरुष मुक्तशैली संघाने दणदणीत कामगिरी करत सांघिक ...
मुंबई मंडळातर्फे २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीतील बांधकाम चालू असलेल्या सदनिका या गटामध्ये कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील संकेत क्रमांक ५३८ व ५३९ मधील १२२१ सदनिकांच्या विक्री किंमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली आहे. मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या १२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका सोडतीत संकेत क्रमांक ५३८-अ व संकेत क्रमांक ५३९-अ या नवीन संकेत क्रमांकान्वये केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बदलामुळे उच्च उत्पन्न गटातील अधिकाधिक नागरिकांना आधुनिक सुविधा असलेले घर मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पातील सोडतीत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येकी एक वाहनतळ विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील मंडळाने जाहीर केला आहे त्यामुळे उच्च उत्पन्न गटातील इच्छुक अर्जदारांसाठी हा प्रकल्प अधिक आकर्षक ठरत आहे.






