Tuesday, July 28, 2026

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून  घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. शाळा - कॉलेजांमध्ये गुरुपौर्णिमा हा दिवस अगदी उत्साहाने साजरा केला जातो मात्र या महिन्यात हा दिवस नक्की आहे कधी ? 28 की 29 जुलैला ? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. या संदर्भात आपण सविस्तर माहिती पुढे जाणून घेणार आहोत.(Marathi News)

कधी साजरी करायची गुरुपौर्णिमा ?

हिंदू पंचांगानुसार आषाढ पौर्णिमेची सुरुवात 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी होत आहे. ही तिथी 29 जुलै रोजी रात्री 8 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणताही सण साजरा करताना उदय तिथीला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे यंदा गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.(Guru Purnima)

गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. यंदाची गुरुपौर्णिमा धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्याही विशेष मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी प्रीती योग आणि हर्षण योगाचा विशेष प्रभाव असल्याचे मानले जाते. प्रीती योगामुळे नात्यांमध्ये प्रेम आणि सुसंवाद वाढतो, तर हर्षण योग हा यश, आनंद आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो.

या गोष्टीचं पालन नक्की करा..

गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंचे पूजन, नामस्मरण, जप, दान आणि साधना करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून महर्षी व्यास किंवा भगवान दत्तात्रेय यांचे पूजन करावे. तसेच आपल्या जीवनातील गुरुंचेही पूजन करावे. गुरुंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर ॐ गुरुदत्तात्रेयाय नम: या मंत्राचा जप करणेही शुभ मानले जाते. तसेच गरजूंना अन्नदान करावे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >