सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस
'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त
मुंबई : भारत आणि सायप्रस यांच्यातील भागीदारी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. चित्रपट आणि सर्जनशील क्षेत्रातील हे सहकार्य दोन्ही देशांना आणखी जवळ आणेल, असा विश्वास राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस यांनी व्यक्त करीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी सायप्रसला दिलेल्या भेटीचा संदर्भही दिला.
पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध ‘आरसीसी पॅटर्न कोचिंग क्लास’वर पुणे ...
सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस हे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच भारत दौऱ्यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत भारत आणि सायप्रस यांच्यातील चित्रपट क्षेत्रामध्ये सहकार्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रसिद्ध निर्माती, लेखिका आणि दिग्दर्शिका अंजली भूषण मगर आणि सायप्रसच्या ग्रीन ऑलिव्ह कंपनीच्या सह-संस्थापक तथा दिग्दर्शिका अथेना झेनिडो यांच्या आगामी 'इश्का' या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. यावेळी फेअर फॅक्स डिजिटल सर्विसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुगनैत, राष्ट्राध्यक्षांच्या उपमंत्री इरानी पिकी, अभिनेता जावेद जाफरी, परराष्ट्र मंत्री डॉ.कॉस्टँडिनोस कॉम्बोस, प्रीती पाणिग्रही, अभिनेता रविकिशन, श्रेया धन्वंतरी, मनीष मनीष, फोकिऑन कराव्हियास आदी उपस्थित होते. या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा मुख्य टप्पा सायप्रसमध्ये पार पडणार आहे.
मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानकाबाहेर उभारण्यात आलेल्या ...
सायप्रसमधील चित्रपट चित्रीकरणाच्या सुविधांविषयी माहिती देताना राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस म्हणाले, सायप्रस हा चित्रपटसृष्टीसाठी एक 'खुला स्टुडिओ' आहे. तिथे अगदी कमी अंतरावर विस्तीर्ण समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू आणि आधुनिक शहरे उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सायप्रस सरकारकडून विशेष सवलती आणि आर्थिक प्रोत्साहने दिली जातात.





