Friday, May 8, 2026

'Raja Shivaji' Movie 'Phool Parijat' Song : 'राजा शिवाजी'मधील ‘फूल पारिजात’ गाणं रिलीज; सईबाई आणि महाराजांच्या नात्यातील प्रेमाची भावूक झलक

'Raja Shivaji' Movie 'Phool Parijat' Song : 'राजा शिवाजी'मधील ‘फूल पारिजात’ गाणं रिलीज; सईबाई आणि महाराजांच्या नात्यातील प्रेमाची भावूक झलक

मुंबई : जिओ स्टुडिओज (Jio Studios) आणि मुंबई फिल्म कंपनी (Mumbai Film Company) निर्मित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji Movie) या भव्य ऐतिहासिक चित्रपटातील ‘फूल पारिजात’ (Phool Parijat) हे नवं गाणं रिलीज झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि महाराणी सईबाई (Maharani Saibai) यांच्या नात्यातील प्रेम, समर्पण आणि आत्मीयतेची हळवी भावना या गीतातून सुंदररीत्या मांडण्यात आली आहे. युद्धभूमीवर शौर्य गाजवणाऱ्या महाराजांचं कोमल, भावनिक आणि प्रेमळ रूप या गाण्यातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे.

अजय-अतुल (Ajay-Atul) यांच्या सुरेल संगीताने सजलेलं हे गाणं शांत, भावपूर्ण आणि अभिजात शैलीत साकारण्यात आलं आहे. प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांच्या मधुर आवाजामुळे गीताला आणखी भावनिक स्पर्श मिळाला आहे. गीतातील प्रत्येक शब्द आणि सूर सईबाईंच्या मनातील प्रेम, भक्तिभाव आणि समाधान प्रभावीपणे व्यक्त करताना दिसतो.

 
View this post on Instagram
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

‘फूल पारिजात’ या शीर्षकातही एक सुंदर भावार्थ दडलेला आहे. पारिजाताच्या फुलाचं रूपक वापरत सईबाईंच्या आयुष्यात महाराजांचं स्थान एखाद्या दैवी आशीर्वादासारखं असल्याची भावना गीतातून प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे हे गाणं केवळ एक Romantic Song न राहता, एका पवित्र आणि आत्मीय नात्याची भावपूर्ण अभिव्यक्ती ठरतं.

स्वराज्य, संघर्ष आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘फूल पारिजात’ हे गाणं चित्रपटात एक शांत आणि भावनिक क्षण निर्माण करतं. सईबाईंच्या नजरेतून उलगडणारं महाराजांचं प्रेमळ रूप प्रेक्षकांच्या मनाला भिडत असून, सोशल मीडियावरही या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

जिओ स्टुडिओज (Jio Studios) प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी (Mumbai Film Company) निर्मित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे (Jyoti Deshpande) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी केली आहे. तर दिग्दर्शन रितेश विलासराव देशमुख (Riteish Vilasrao Deshmukh) यांनी केलं आहे. 1 मे 2026 रोजी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पाहा ‘फूल पारिजात’ (Phool Parijat Song) चा संपूर्ण Video :

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >