Sunday, July 12, 2026

Rinku Rajguru Album Song : ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूचा नवा अंदाज; पहिलं अल्बम साँग ‘बाप विठुराया’ प्रदर्शित

Rinku Rajguru Album Song : ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूचा नवा अंदाज; पहिलं अल्बम साँग ‘बाप विठुराया’ प्रदर्शित

मुंबई : ‘सैराट’ (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आता एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आतापर्यंत चित्रपटांमध्ये (Movies) विविध भूमिका साकारलेल्या रिंकूने पहिल्यांदाच अल्बम साँग (Album Song) केलं आहे. ‘बाप विठुराया’ (Baap Vitthuraya) असं या वारी स्पेशल (Wari Special) गाण्याचं नाव आहे.

आषाढी वारी (Ashadhi Wari) आणि विठ्ठल भक्तीचा (Vitthal Bhakti) उत्साह सुरू असताना रिंकू राजगुरूने तिच्या चाहत्यांना खास भेट दिली आहे. काही दिवसांपूर्वी रिंकूचे वारीमधील फोटो (Photos) सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल (Viral) झाले होते. त्यानंतर ती काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून ‘सारेगम मराठी’ (Saregama Marathi) कडून ‘बाप विठुराया’ हे गाणं प्रदर्शित (Release) करण्यात आलं आहे. या गाण्याला प्रसिद्ध गायक अजय गोगावले (Ajay Gogavale) यांचा दमदार आवाज लाभला आहे. अजय यांच्या आवाजाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. विठ्ठल भक्ती, श्रद्धा आणि भावनांचा सुंदर मिलाफ या गाण्यात पाहायला मिळतो.

“माझं पहिलं अल्बम गाणं विठ्ठलावर असणं खास” – रिंकू राजगुरू

या गाण्याबद्दल बोलताना रिंकू राजगुरूने सांगितलं की, तिचं पहिलं अल्बम साँग विठ्ठलावर आधारित असणं ही तिच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. रिंकू म्हणाली, “माझं आणि विठ्ठलाचं नातं खूप जुनं आहे. माझी विठ्ठलावर खूप श्रद्धा आहे. तो माझ्या प्रत्येक गोष्टीत माझ्यासोबत असतो. विठ्ठल हा माझ्या आयुष्यातील एक हळवा भाग आहे. त्यामुळे हे गाणं करताना खूप खास भावना होत्या.”

रिंकूने पुढे सांगितलं की, तिने याआधी कधीही अल्बम सॉंग केलं नव्हतं. तिची काम करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे ती अशा प्रोजेक्ट्सपासून दूर होती. मात्र ‘बाप विठुराया’च्या माध्यमातून पहिल्यांदाच हा अनुभव घेताना तिला खूप आनंद होत आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांनंतर अजय गोगावले यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचंही तिने सांगितलं.

रिंकूचा नवा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस

‘बाप विठुराया’ या गाण्यात रिंकू राजगुरूचा याआधी कधीही न पाहिलेला वेगळा लूक (Look) पाहायला मिळत आहे. तिचा साधा, भक्तिमय आणि लक्षवेधी अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. गाण्याचा व्हिडीओ (Video) शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी (Netizens) रिंकूवर लाइक्स (Likes) आणि कमेंट्सचा (Comments) वर्षाव केला आहे. रिंकू राजगुरूचा हा पहिलाच अल्बम साँग असल्याने तिच्यासाठी हे गाणं विशेष ठरत आहे. विठ्ठल भक्तीच्या भावनेने भरलेलं ‘बाप विठुराया’ यंदाच्या वारीचा उत्साह आणखी वाढवणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >