Tuesday, May 5, 2026

Vijay Thalapathy : करुणानिधींच्या मागे उभ्या असलेल्या या मुलाने डीएमके पक्षाला दिला मोठा धक्का, तुम्ही त्या मुलाला ओळखले का?

Vijay Thalapathy : करुणानिधींच्या मागे उभ्या असलेल्या या मुलाने डीएमके पक्षाला दिला मोठा धक्का, तुम्ही त्या मुलाला ओळखले का?
तामिळनाडू : चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर करत ‘कलाइग्नार’ एम. करुणानिधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, त्यांच्या मागे उभा असलेला हा छोटा मुलगा एक दिवस त्यांच्या पक्षालाच असा मोठा धक्का देईल, याची कल्पनाही करुणानिधींना कधीच नव्हती. अनेक दशकांपूर्वीचा हा फोटो आहे. त्या वेळी करुणानिधी एका कार्यक्रमात आनंदाने रिबन कापताना दिसत आहेत. त्यांच्या मागे एक लहान मुलगा हसतमुखाने उभा आहे. त्या मुलाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत असून, जणू तो मनात म्हणत आहे, “एक दिवस मीही काहीतरी मोठं करणार.” त्या क्षणी करुणानिधींना याची अजिबात जाणीव नव्हती की, पुढील काळात हाच मुलगा त्यांच्या पक्षासाठी मोठं आव्हान ठरेल.
तामिळनाडूवर पाच वेळा राज्य करणारे करुणानिधी आता हयात नाहीत. २०१८ साली त्यांचे निधन झाले. मात्र, काळाच्या ओघात परिस्थिती इतकी बदलली की, २०२६ मध्ये त्याच मुलाने त्यांच्या पक्षाला राजकीयदृष्ट्या मोठा फटका दिला आणि सत्तेपासून दूर केलं. कोण आहे हा मुलगा? राम गोपाल वर्मा यांनी शेअर केलेल्या या फोटोवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी आश्चर्य व्यक्त केलं, तर काहींनी राजकीय भाष्य केलं. एका युजरने तर असंही म्हटलं की, “या मुलाने केवळ पक्षालाच धक्का दिला नाही, तर करुणानिधींच्या वारसाचं राजकीय भवितव्यही डळमळीत केलं.”
या मुलाचा तामिळनाडूच्या राजकारणाशी अतिशय जवळचा संबंध आहे. खरं तर, याच मुलामुळे करुणानिधींचा पक्ष राज्याच्या सत्तेपासून दूर गेला. त्यांचा मुलगा एम. के. स्टॅलिन यांनाही मोठा राजकीय धक्का बसला आणि मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. आता उत्सुकता संपवून सांगायचं झालं, तर हा मुलगा दुसरा कोणी नसून लोकप्रिय अभिनेता 'थलपती विजय' आहे. त्या वेळी तो सुमारे १० ते १२ वर्षांचा होता. करुणानिधींनी कधी कल्पनाही केली नसेल की, त्यांच्या मागे उभा असलेला हा लहान मुलगा एक दिवस मोठा होऊन त्यांच्या स्वतःच्या पक्षालाच राजकीय आव्हान देईल आणि त्यांना पराभवाचा सामना करायला लावेल. विजयच्या पक्षाचा मोठा विजय २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजयच्या टीव्हीके पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत १०८ जागा जिंकल्या. विजयच्या करिष्म्यापुढे डीएमके आणि स्टॅलिन यांची पकड कमकुवत पडली. डीएमकेला केवळ ७३ जागांवर समाधान मानावं लागलं. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत १०० पेक्षा अधिक जागा जिंकणं, हे खरोखरच उल्लेखनीय ठरलं आहे. तामिळनाडूमधील या राजकीय उलथापालथीची चर्चा आता संपूर्ण देशभर होत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >