Monday, May 4, 2026

Mumbai : मुंबईत ड्युटी करणाऱ्या हवालदाराने टिटवाळ्यात केली आत्महत्या

Mumbai : मुंबईत ड्युटी करणाऱ्या हवालदाराने टिटवाळ्यात केली आत्महत्या
Police Sucide News : मुंबईतील यलो गेट पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या भाऊराव दगडू ढगे या ४२ वर्षीय पोलिसाने टिटवाळा येथे रेल्वे पुलाखाली गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. स्थानिक पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. आत्महत्या करणारा हवालदार टिटवाळा येथील गीतांजली इमारतीत वास्तव्यास होता. तो तिथला स्थानिक रहिवासी होता. मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कातळापूरचे भाऊराव ढगे रविवारी रात्री गावावरून परतले. त्यांनी गावावरून परतल्यानंतर टोकाचे पाऊल उचलले. नेमके काय घडले ज्यामुळे हवालदार ढगे यांनी टोकाचे पाऊल उचलले याचा तपास पोलीस करत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >