Monday, May 4, 2026

Assam : आसामध्ये भाजपची हॅटट्रिक, एकहाती विजय

Assam : आसामध्ये भाजपची हॅटट्रिक, एकहाती विजय

नवी दिल्ली : आसामच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता येत असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आसामच्या १२६ जागांच्या विधानसभेत भारतीय जनता पार्टी ७९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर आहे. बीओपीएफ १०, एजीपी ९ आणि एआययूडीएफ २ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत १२४ जागांचे आकडे हाती आले असून भाजपची सलग तिसऱ्यांदा सत्ता येत असल्याचे दिसत आहे.

मागच्यावेळी भाजपने ६० जागा जिंकून युतीच्या जोरावर सत्ता मिळवली होती. यावेळी भाजपची एकहातीच सत्ता येताना दिसत आहे.

ईशान्य भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसाममध्ये एकाच टप्प्यात ८० टक्के मतदान झाले होते. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (NRC) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) यांसारख्या मुद्द्यांमुळे आसामची निवडणूक गाजली. आसाममध्ये १२६ जागांच्या विधानसभेत ६४ जागा हा बहुमताचा आकडा आहे. सद्यस्थितीत हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसने महाआघाडी करून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येताना दिसत आहे.

Comments
Add Comment