Monday, July 6, 2026

Pawna Lake Landslide : पुण्यातील पवना लेक परिसरात दरड कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Pawna Lake Landslide : पुण्यातील पवना लेक परिसरात दरड कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

पुणे(Pune) : पुणे जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवना लेक परिसरात दरड कोसळली आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली किमान २० ते ३० जण अडकले असल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

दरड कोसळल्याची माहिती मिळताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशमन दल यांनी तातडीने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले आहे. दरडीखाली अडकलेल्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

पवना लेक परिसरासह मावळ आणि लोणावळ्यात पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे. बोरावली स्टेशन आणि तळेगाव दाभाडे येथे स्कोडा कंपनीच्या परिसरात पाणी शिरले आहे. या पाण्यात एक बस अडकली होती. बसमधील प्रवाशांची (PMRDA) च्या जवानांनी सुटका केली. पाटणबोराज रोड येथे घरावर दरड कोसळली. यामुळे घरातील चार जण अडचणीत सापडल्याचे वृत्त आहे. पाटण गावात पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनेमुळे पडझड झाली आहे.(NDRF) आणि (PDRF) संयुक्तपणे मदतकार्य करत आहेत. ढिगाऱ्यात अडकलेल्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहे.

देहूगावातील निवासी भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे, तर आळंदी येथील धानोरे गावात झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता, तो अग्निशमन दलाने तात्काळ मोकळा केला आहे.

सोशल मीडिया किंवा इतर अनधिकृत माध्यमांतून येणाऱ्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पवना लेक, लोणावळा आणि घाटमाथ्याकडे जाणाऱ्यांनी तूर्तास तिथे जाणे टाळा. जारी केलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी (PMRDA) चे आपत्ती व्यवस्थापन २४*७ कार्यरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >