मुंबई: लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या अभिनयातील वेगळेपणामुळे आणि लक्षात राहणाऱ्या भूमिकांमुळे ती प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. विशेषतः तिने साकारलेली 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता' ही भूमिका आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. दरम्यान, अपूर्वानं अलीकडेच तिच्या आगामी प्रोजेक्टची झलक सोशल मीडियावर शेअर केली. त्या व्हिडिओतील तिचा लूक पाहून अनेकांना ‘शेवंता’ची आठवण झाली, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चर्चेला पूर्णविराम देत अपूर्वानं ‘पद्मिनी’ या मायक्रोड्रामा हॉरर सीरिजची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही सीरिज 'एआय'वर आधारित असून तिची प्रस्तुतीदेखील अपूर्वानं स्वतः केली आहे.
पुणे: पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. एका ६५ वर्षीय नराधमाने ४ वर्षीय ...
“काहीतरी वेगळं, अंतर्मुख आणि सिनेमॅटिक करायचं होतं” – अपूर्वा नेमळेकर
कॅलगरी : कॅनडातील कॅलगरी येथे गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझच्या ‘ऑरा टूर’ नावाच्या कॉन्सर्टदरम्यान अनपेक्षित तणाव निर्माण झाला. कार्यक्रम सुरू ...
सामाजिक आशय असलेली थरारक भयकथा
‘पद्मिनी’ या मायक्रोड्रामा हॉरर सीरिजमधील प्रत्येक भागात वेगवेगळ्या घटनांभोवती फिरणारं कथानक उलगडताना दिसणार आहे. पाऊस, वारा, शांतता अशा विविध वातावरणांमध्ये कथा पुढे सरकते, ज्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. ही सीरिज फक्त भीती निर्माण करणारी नाही, तर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी आहे, असं अपूर्वा स्पष्ट करते. ती पुढे म्हणाली, “या कथेत अन्याय आणि त्या अन्यायाशी जोडलेल्या आठवणींचं प्रतिबिंब आहे. ‘पद्मिनी’ ही एक शक्ती आहे, जी विस्मरणात गेलेलं सत्य पुन्हा समोर आणते. न्याय विरुद्ध सूड, सामर्थ्य विरुद्ध असुरक्षितता असे अनेक स्तर या कथेत आहेत. ही केवळ भयकथा नसून ती एक सामाजिक भाष्य आहे. कथानकात अनेक रहस्यमय आणि अनपेक्षित वळणं आहेत, जी प्रत्येक भागागणिक उलगडत जातील. सत्ता, अन्याय आणि सत्य यावर भाष्य करणारी ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.”




