Thursday, July 2, 2026

Lock Upp 2 : राम कपूरच्या 'त्या' एका वक्तव्यावर कंगना भडकली! भर शोमध्ये अभिनेत्याला सुनावले खडेबोल; पाहा नेमकं काय घडलं...

Lock Upp 2 : राम कपूरच्या 'त्या' एका वक्तव्यावर कंगना भडकली! भर शोमध्ये अभिनेत्याला सुनावले खडेबोल; पाहा नेमकं काय घडलं...
Lock Upp 2 : लोकप्रिय अभिनेता राम कपूर (Ram kapoor) सध्या 'लॉकअप २' (Lock UPp 2) या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. शोमध्ये केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्याच्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर शोच्या नुकताच प्रसारित झालेल्या भागात अभिनेत्री कंगना राणौतने त्याला स्पष्ट शब्दांत सुनावले.

'लॉकअप'च्या पहिल्या पर्वात कंगना राणौत (Kangana Ranaut) सूत्रसंचालक होती. दुसऱ्या पर्वात फराह खान आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) ही जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात कंगना विशेष पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. यावेळी तिने राम कपूरच्या खेळावर आणि त्याच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली.

कंगना म्हणाली की, जर एखाद्या स्पर्धकाला वाटत असेल की तो या शोपेक्षा मोठा कलाकार आहे, तर त्याने या कार्यक्रमात सहभागी होण्याची गरज नव्हती. तसेच स्वतःचा बचाव करण्यापेक्षा आपल्या वागण्यात बदल करण्याचा सल्लाही तिने राम कपूरला दिला. (Entertainment News)

यावर राम कपूरने उत्तर देताना योग्य वेळ आल्यावर आपण आपली खरी बाजू सर्वांसमोर मांडू, असे सांगितले. मात्र, कंगनाने त्याला पुन्हा एकदा स्वतःचे समर्थन करण्याऐवजी कृतीतून बदल दाखवण्याचा सल्ला दिला. (Lock Upp 2 )

याआधीही शोमध्ये राम कपूर आणि फराह खान यांच्यात मतभेद पाहायला मिळाले होते. एका टास्कदरम्यान फराहने त्याला स्पष्ट शब्दांत सांगितले की, मोठ्या भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता असूनही या शोमध्ये तो अपेक्षित प्रभाव पाडू शकलेला नाही. त्यावर रामने आपण जसे आहोत तसेच राहणार असल्याचे उत्तर दिले होते.

राम कपूरच्या वक्तव्यांमुळे आणि शोमधील त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू असून पुढील भागांमध्ये तो आपल्या खेळात काही बदल करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ( Celebrity News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >