Wednesday, April 29, 2026

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रस्ते सिमेंट काँक्रिटची कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत १७९५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे. सध्या उर्वरीत ३०५ किलोमीटरपैंकी १७९ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे सुरु असून ज्या रस्त्यांची कामे ७५ टक्क्यांपेक्षा पूर्ण झाली आहेत, ही सर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्यात येतील आणि त्यापेक्षा कमी टक्क्यांएवढी हाती घेण्यात आलेली कामे पूर्ण होणार नसल्याने १ जुनपर्यंत त्या रस्त्यांचा भाग वाहतुकीसाठी मास्टिक अस्फाल्टद्वारे सुस्थितीत आणून देण्याचा प्रयत्न करावा अशाप्रकारच्या सूचना कंत्राटदारांना आणि रस्ते विभागाला दिल्याचे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.

मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतला. या बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह सर्व महापालिका उपायुक्त, खातेप्रमुख एमएमआरडीए, म्हाडा, रेल्वे, नेव्ही आदींचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना आश्विनी भिडे यांनी मुुंबईत सध्या २०२५ किलोमीटर लांबीचे रस्ते असून त्यातील १२४० किलोमीटर लांबीचे रस्ते यापूर्वीचे सिमेंट काँक्रिटचे झाले आहेत. त्यानंतर ७०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली त्यातील ५०० किलोमीटर लांबीचे अशाप्रकारे एकूण १७९५ किलोमीटर लांबीचे रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आतापर्यंत ३०५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे कामे शिल्लक असून त्यातील १७९ किलोमीटर लांबीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. तर त्यामुळे ज्या रस्त्यांची कामे सध्या ४५ ते ९० टक्क्यांपर्यंत झालेली आहेत.त्यामुळे ज्या रस्त्यांची कामे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत, त्या रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि ते केले जातील. तसेच ७० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या रस्त्यांची कामे १५ मे पर्यंत जर खोदकाम केलेले असेल तर बुजवून हा रस्ता पूर्वस्थितीत करून दिला जावा. तसेच वाहतुकीसाठी पूर्व स्थितीत करताना मास्टिक अस्फाल्टद्वारे त्याची सुधारणा करावी, त्यावरील राडारोडा आणि इतर काही असतील तर काढून वाहतुकीसाठी व्यवस्थित करून देण्यात येईल्,अशाप्रकारचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले असल्याचे भिडे यांनी सांगितले.

मुंबई खऱ्या अर्थाने खड्डेमुक्तीच्या दिशेने

मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे. मागील तीन वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या मोठ्या कार्यक्रमामुळे जिथे सन २०२३ मध्ये २०३ कोटी रुपये खर्च व्हायचे तिथे आता सन २०२५मध्ये खड्डे दुरुस्तीवरील खर्च हा ४५ कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे ज्या १३९ रस्त्यांवरील जी कामे हाती घेण्यात आलेली नाही तसेच पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खराब भाग आणि खड्डे बुजवण्याचे काम यामाध्यमातून केले जाणार आहे. तसेच रस्त्यांच्या बाजुला जे पट्टे असतात ते सुस्थितीत करण्याचा प्रयत्न केला जाईल, यासाठी पोटहोल फिक्स या ऍपचा वापर नागरिकांनी करून खड्डयांच्या तक्रारी असल्यास कळवाव्यात अशाप्रकारेच आवाहन केले आहे.

Comments
Add Comment