'उबाठा'च्या जवळीकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाष्य; २०१९ ला प्रेमभंग झाल्यामुळे दुसरे लग्न करून संसार थाटला
मुंबई : "माना के तेरे जहाँ में यह नही की प्यार नही मिलता... वो जब चाहिए तब नही मिलता! उद्धव ठाकरेंनी जे प्रेम आता दाखवले, ते मला २०१९ मध्ये हवे होते. तेव्हा आमचा प्रेमभंग झाला. प्रेमभंगानंतर आम्ही दुसरे लग्न केले, नवा संसार थाटला आणि त्या लग्नाचे वाढदिवस झाले! त्यामुळे आता पुन्हा प्रेम जुळणे कठीण आहे", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra FAdanvis) यांनी गुरुवारी स्पष्ट केले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्ध्याच्या राजकीय स्थितीवर विस्तृत भाष्य केले.
शिवसेनेच्या बंडखोर खासदारांबाबत मोठा खुलासा करताना फडणवीस म्हणाले, "जे ६ खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले, ते मूळचे शिवसेनेचेच असल्याने त्यांनी तिथेच जावे ही आमची भूमिका होती. भाजपचे दार कोणासाठीही उघडे नव्हते. उलट, त्या ६ पैकी एक-दोन खासदारांची भाजपमध्ये येण्याची इच्छा होती; मात्र सध्या भाजपमध्ये अशी कोणतीही व्यवस्था नसल्याचे आम्ही त्यांना स्पष्ट सांगितल्यामुळे ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले."
पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील महिला डॉक्टर डॉ. ...
उपमुख्यमंत्री यांची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची मनिषा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात कायम सुरू असते. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, "महायुतीमध्ये कोणाच्या अपेक्षांची उड्डाणे कुठे चालली आहेत यावर चर्चा करण्यापेक्षा राज्यातील सध्याची राजकीय वस्तुस्थिती (पॉलिटिकल रिअॅलिटी) समजून घेतली पाहिजे. ज्या राज्यामध्ये बहुमतासाठी १४५ जागांची आवश्यकता असते, तिथे ज्या पक्षाकडे स्वतःचे १३७ आमदार निवडून आलेले आहेत, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार की दुसऱ्या पक्षाचा? १३७ आमदार असलेल्या पक्षाचे नेते त्यांच्याच नेत्याला मुख्यमंत्री करत असतात. हीच खरी वास्तविकता आहे आणि ती मला व एकनाथ शिंदे दोघांनाही नीट माहिती आहे."
'ऑपरेशन टायगर'(Opretion Tigar)मध्ये भाजपचा किती सहभाग होता? यावर बोलताना फडणवीस म्हणाले, अशा ऑपरेशन्समध्ये काय घडले हे सुज्ञ राजकारणी व्यक्ती जाहीरपणे सांगत नाही. आमच्या मित्रपक्षांनी ते ऑपरेशन केले, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आणि आवश्यक ती मदत होती. तर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांवर बोलताना ते म्हणाले, "दिल्लीत अशा छोट्या-मोठ्या स्थानिक गोष्टींचे भांडण सुटत नाही. दिल्लीला खूप कामे आहेत, ते अशा गोष्टी एंटरटेन करत नाहीत. जे काही निर्णय व्हायचे ते महाराष्ट्रातच होतात आणि हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचला आहे."
मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या ...
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या निधनानंतर अर्थखाते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हे खाते राष्ट्रवादीला परत मिळणार का? या बाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, "सध्यातरी हे खाते माझ्याकडे आहे. पुढे ते कोणाला द्यायचे, यावर मी आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करेन आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेईन." विरोधी आमदारांना किती निधी दिला?
विरोधी आमदारांना निधी मिळत नसल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले, "पक्षांतरासाठी केवळ निधी हे एकमेव कारण असू शकत नाही, तर आपले नेतृत्व आपले भविष्य सुरक्षित करू शकते की नाही, यावर आमदार निर्णय घेतात. आम्ही विरोधी पक्षातील ९० टक्के लोकांना बजेटमधील पीडब्ल्यूडी विभागातून काही ना काही निधी दिला आहे. आम्ही २०१९ ते २०२२ विरोधी पक्षात असताना आम्हाला काहीच मिळत नव्हते, तरीही आमचा एकही आमदार फुटला नाही. कारण गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या आमच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला होता. जेव्हा नेत्यावरील विश्वास संपतो, तेव्हाच पक्ष संपतो; निधी हा दुय्यम विषय आहे", असे त्यांनी स्पष्ट केले.




