मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे कोसळणे, वाहतूक कोंडी, वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटनेते अमेय घोले (Shivsena Amey Ghole) यांनी आपल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तत्काळ सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी, यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवसेनेच्या निर्देशानुसार, प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या-आपल्या परिसरात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचून नागरिकांना आवश्यक ती मदत करावी. पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर प्रशासनाशी समन्वय साधून त्वरित उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे. (Shivsena Amey Ghole)
मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने (Mumbai Rain) जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. ...
याशिवाय, ज्या भागात शिवसेनेचे खासदार, आमदार किंवा नगरसेवक आहेत, त्या भागातील मदतकार्य आणि समन्वयाची जबाबदारी संबंधित लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येणार आहे. तर, ज्या भागात शिवसेनेचा लोकप्रतिनिधी नाही, त्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेशी समन्वय साधण्यासाठी विशेष नोडल प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. (Shivsena Amey Ghole)
नोडल प्रतिनिधींची जबाबदारी :
पश्चिम उपनगर – उपमहापौर संजय घाडी पूर्व उपनगर – बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव शहर विभाग – अमेय घोले
मुंबई : जून महिना जवळपास कोरडाच गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत १ जुलै रोजी ...
पक्षाने सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की, परिसरातील कोणतीही आपत्कालीन घटना, अडचण किंवा मदतकार्याची माहिती संबंधित नोडल प्रतिनिधींना तात्काळ कळवून आवश्यक कार्यवाही करावी. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्वांनी सतर्क राहून समन्वयाने काम करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (Shivsena Amey Ghole)




