Tuesday, April 21, 2026

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिणची धुरा

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिणची धुरा

- महाराष्ट्र भाजपकडून जिल्हानिहाय प्रभारी जाहीर

मुंबई : संघटन बांधणी मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र भाजपने मंगळवारी जिल्हानिहाय प्रभारींची नियुक्ती केली. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे रायगड दक्षिण जिल्ह्याच्या प्रभारी पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकणात पक्षाची पकड अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

सिंधुदुर्गसाठी आमदार योगेश सागर, रत्नागिरी उत्तरसाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि रत्नागिरी दक्षिणसाठी निरंजन डावखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड उत्तर भागाची जबाबदारी अतुल काळसेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ठाणे आणि नवी मुंबईसाठीही पक्षाने विशेष रणनीती आखली आहे. ठाणे शहरासाठी विक्रांत पाटील, तर ठाणे ग्रामीणच्या प्रभारीपदी उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांची वर्णी लागली आहे. नवी मुंबईत शशिकांत कांबळे, कल्याणमध्ये जयप्रकाश ठाकूर आणि उल्हासनगरमध्ये नाना सूर्यवंशी संघटनात्मक बांधणीचे काम पाहतील. पालघरसारख्या आदिवासी बहुल आणि संवेदनशील जिल्ह्यासाठी राणी द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक दक्षिण जिल्ह्याची धुरा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असून, नाशिक शहरासाठी मंगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. धुळे शहरात माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असून, धुळे ग्रामीणसाठी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव जिल्ह्यातही रोहिणी नायडू, अनुप अग्रवाल आणि प्रदीप पेशकार यांच्याकडे विविध विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अहिल्यानगर उत्तर भागात लक्ष्मण सावजी हे पक्षाचे काम पाहतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >