ओमान सागरातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे. इराणने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की अमेरिकेने त्याच्या मालवाहू जहाज तोस्कावर हल्ला करून ते ताब्यात घेतले आहे. तेहरानने या कारवाईला समुद्री दरोडा ठरवत कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
इराणच्या लष्करी मुख्यालय हजरत खातम अल-अंबिया कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकन सैन्याने ओमान सागरातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणी जहाजावर हल्ला केला. निवेदनानुसार, अमेरिकन मरीन दलाने जहाजावर चढाई करून त्याची नेव्हिगेशन प्रणाली निष्क्रिय केली आणि जहाज जप्त केले.
राजस्थानमधील पाचपद्रा Pachpadra येथे उभारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित रिफायनरीत आज म्हणजेच सोमवार २० एप्रिल रोजी दुपारी अचानक भीषण आग लागली. विशेष म्हणजे, ...
अमेरिकेने ही संपूर्ण कारवाई व्यावसायिक आणि संतुलित असल्याचे म्हटले आहे. तसेच जहाजावर अमेरिकन मरीन तैनात असून, त्यामध्ये कोणता माल आहे याची तपासणी सुरू असल्याचेही सांगितले आहे. या जहाजाचे नाव तोस्का असल्याचे सांगितले जात आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले की, हे जहाज अमेरिकन नौदलाच्या गाइडेड-मिसाइल डेस्ट्रॉयरने ओमानच्या आखातात अडवले. त्याला थांबण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र जहाजाने आदेश पाळले नाहीत. त्यानंतर नौदलाने थेट कारवाई करत इंजिन कक्षाला लक्ष्य केले आणि जहाज थांबवले.
इराणच्या सत्ताकेंद्रावर आता कट्टरपंथी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) यांचे वर्चस्व निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. अहवालानुसार, ...
ही घटना अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा ट्रम्प यांनी यापूर्वी घोषणा केली होती की अमेरिकन प्रतिनिधीमंडळ सोमवारी पाकिस्तानमध्ये जाऊन इराणसोबत दुसऱ्या फेरीची चर्चा करणार आहे. त्यामुळे दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. व्हाईट हाऊसनुसार, उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स अमेरिकन प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या सोबत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हेही असणार आहेत. या दोघांनी पहिल्या फेरीतील दीर्घ चर्चेतही सहभाग घेतला होता.





