लंडन : फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्यावर दोन महिलांशी संबंधित लैंगिक अत्याचाराचे चार आरोप ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया वृत्तानुसार, अग्रवाल यांना लंडनमध्ये अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. (Mehul Choksi's Lawyer)
अग्रवाल यांची वैयक्तिक सहाय्यक मनप्रीत कौर यांनाही अटक करण्यात आली असून, लैंगिक अत्याचाराच्या दोन कथित घटनांना जाणूनबुजून प्रोत्साहन किंवा मदत केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. (Mehul Choksi's Lawyer)
मुंबई : बॉलिवूड अभिनेते गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनिता आहुजा यांच्या नात्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सुनिता ...
११ ऑगस्टला मायफेअर परिसरातून अटक :
५७ वर्षीय विजय अग्रवाल आणि ४१ वर्षीय मनप्रीत कौर यांना ११ ऑगस्ट रोजी लंडनच्या मायफेअर परिसरातील २९ ब्रिक स्ट्रीट येथून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. दोघेही एका आलिशान सर्व्हिस्ड टाउनहाऊसमध्ये राहत होते. या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी दोघांना वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट्स कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून प्रकरण पुढील सुनावणीसाठी साउथवार्क क्राउन कोर्टाकडे पाठवण्यात आले आहे. (Mehul Choksi's Lawyer)
अग्रवाल यांच्यावर चार आरोप :
अग्रवाल यांच्यावर दोन महिलांशी संबंधित लैंगिक अत्याचाराचे चार आरोप आहेत. त्यापैकी तीन आरोप ९ ऑगस्ट रोजी कथितरित्या घडलेल्या घटनेशी संबंधित आहेत, तर चौथा आरोप २६ मे रोजी घडलेल्या कथित घटनेशी संबंधित आहे. आरोपांनुसार, संमतीशिवाय एका महिलेचा लैंगिक हेतूने जाणूनबुजून स्पर्श करण्यात आल्याचा दावा आहे. हे आरोप ब्रिटनच्या Sexual Offences Act 2003 मधील कलम ३ अंतर्गत करण्यात आले आहेत. (Mehul Choksi's Lawyer)
सहाय्यक महिलेवरही गंभीर आरोप :
मनप्रीत कौरवर २६ मे आणि ९ ऑगस्ट रोजी घडल्याचा आरोप असलेल्या घटनांमध्ये लैंगिक अत्याचाराला जाणूनबुजून प्रोत्साहन किंवा मदत केल्याचे दोन आरोप आहेत. वृत्तानुसार, बनावट नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करून दोन महिलांना अग्रवाल यांच्याशी भेटवून दिल्याचा आणि त्यांना संबंधित ठिकाणी बोलावल्याचा आरोप तिच्यावर आहे. (Mehul Choksi's Lawyer)
नैरोबी : केन्यामध्ये पर्यटकांना सफारीसाठी घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पायलटसह सर्व सात जणांचा ...
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून २३ वर्षीय पुरुष आणि ४३ वर्षीय महिलेलाही ११ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, पुढील चौकशीपर्यंत त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. कथित लैंगिक अत्याचाराची तक्रार करणाऱ्या दोन्ही महिलांना विशेष अधिकाऱ्यांकडून मदत दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. (Mehul Choksi's Lawyer)
मेहुल चोक्सीचे वकील म्हणून काम :
विजय अग्रवाल हे फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सी यांचे वकील आहेत. बेल्जियममधील अँटवर्प येथे सुरू असलेल्या चोक्सीच्या प्रत्यार्पण प्रकरणात अग्रवाल त्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. मेहुल चोक्सीला भारताच्या प्रत्यार्पण विनंतीनंतर एप्रिल २०२५ मध्ये अटक करण्यात आली होती. पंजाब नॅशनल बँकेतील सुमारे १३,५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी भारतीय तपास यंत्रणांकडून चोक्सी, नीरव मोदी आणि इतरांवर आरोप आहेत. चोक्सीने हे आरोप फेटाळले आहेत. (Mehul Choksi's Lawyer)





