चौपाट्यांच्या अस्वच्छतेवरून नगरसेवकांनी तीव्र नाराजी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या किनारपट्टीचे संवर्धन, संरक्षण, व्यवस्थापन व शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिके अंतर्गत स्वतंत्र 'कोस्टल कमिटी' स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये कोळ्यांची व्याख्या सुस्पष्ट करण्यात यावी या उपसूचनेसह हा ठराव मंजहूर करण्यात आला. भाजप नगरसेविका योगिता कोळी यांनी मांडलेल्या ठरावाची सूचना महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आली. त्यामुळे सागरी जैवविविधतेचे संरक्षण, कोळीवाड्यांच्या मूलभूत सुविधांचा विकास व पुनर्विकास, जलक्रीडा व सागरी पर्यटनाला प्रोत्साहन, किनारी विकासाचे नियोजन तसेच किनारी भागांतील अतिक्रमण व पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनाचे नियोजन, समन्वय व देखरेख करण्याची जबाबदारी देता येणे शक्य होणार आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर विशाखा राऊत यांचे महापालिका सदस्यत्व आता ...
सागरी जैवविविधतेचे संरक्षण, कोळीवाड्यांच्या मूलभूत सुविधांचा विकास व पुनर्विकास, जलक्रीडा व सागरी पर्यटनाला प्रोत्साहन, किनारी विकासाचे नियोजन तसेच किनारी भागांतील अतिक्रमण व पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनाचे नियोजन, समन्वय व देखरेख करण्याची जबाबदारी देता येणे शक्य होईल. यासाठी मुंबईच्या किनारपट्टीचे संवर्धन, संरक्षण, व्यवस्थापन व शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत स्वतंत्र 'कोस्टल कमिटी' स्थापन करण्यात यावी अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे योगिता कोळी यांनी मांडला. यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पाठिंबा देत ही समिती नेमताना कोळ्यांची व्याखा ठरवण्याची मागणी केली. तर अंकित प्रभू यांनी अनेक सागरी किनारा लाभलेल्या शहरांनी ज्या उपाययोजना राबवल्या आहेत, त्याचा विचारही केला जावा अशी मागणी केली. तर काँग्रेसचे विरेंद्र चौधरी यांनी जुहू चौपाटीचा परिसर स्वच्छ दिसत असला तरी बाकीच्या चौपाट्या या अस्वच्छ असून त्यावर मोठ्याप्रमाणात कचरा दिसून येत आहे. निवाटे यांनी जुहू चौपाटी स्वच्छ करताना खार दांडा परिसरात तेथील कचरा टाकला. त्यामुळे हा परिसर कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड बनले असल्याचे सांगितले. जर अफरोझ हा एकटा चौपाट्यांची स्वच्छता करू शकतो तर महापालिका का करू शकत नाही असा सवाल तुलिफ मिरांडा यांनी केला. तर गोराई चौपाटीची स्वच्छता होत नसून दीड किलोमीटरचा परिसर या स्वच्छतेच्या कामांमध्ये समावेश करण्याची मागणी शिवानंद शेट्टी यांनी केली. तर सभागृहनेेते गणेश खणकर यांनी चौपाटीची स्वच्छता राखण्याची ही जबाबदारी असतानाच तिवरांच्या ज्या जागा आहेत, त्यावर भराव होणार नाही याची काळजी कोण घेणार असा सवाल केला.यावेळी झालेल्या चर्चेत हेमांगी वरळीकर, स्वप्ना म्हात्रे, संगीता कोळी आदींनी भाग घेतला होता. त्यामुळे उपसूचनेसह ठरावाची मूळ सूचना मंजूर करण्यात आली आहे.





