सोमवारी जपानच्या ईशान्य किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला. जपानच्या हवामान विभागाने Japan Meteorological Agency (JMA)ने याला दुजोरा दिला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर इवाते प्रांताजवळ समुद्रात होता. स्थानिक वेळेनुसार दुपारी ४:५३ वाजता या भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याने त्याची तीव्रता अधिक जाणवली.
मुंबई : संसदेत महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान करून विरोधकांनी देशातील नारीशक्तीचा अपमान केला असून, या मानसिकतेचा 'बुरखा' फाडण्यासाठी ...
एकीकडे भूकंप तर दुसरीकडे त्सुनामीचे संकट :
भूकंपानंतर उत्तर जपानमधील एका बंदरावर ८० सेंटीमीटर (३१ इंच) उंचीची त्सुनामी लाट धडकली. जेएमएने सांगितले की, इवातेमधील कुजी येथील बंदरावर सायंकाळी ५:३४ वाजता (०८३४ जीएमटी) ही लाट दिसून आली. यापूर्वी सायंकाळी ५:३२ वाजता ७० सेंटीमीटर उंचीची लाट धडकल्याचे सांगण्यात आले होते. त्सुनामीच्या सर्वात आधीच्या लाटा उत्तरेकडील किनारपट्टीवर तात्काळ पोहोचू शकतात, असे हवामान संस्थेने म्हटले आहे.






