Saturday, September 13, 2025

"मुख्यमंत्री २० तास काम करतात, हे डोळ्यांमध्ये खुपतंय" : श्रीकांत शिंदे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त गणेशोत्सव नव्हे तर ज्या प्रकारांनी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले. त्याची विरोधकांनी धास्ती घेतली आहे. हा माणूस दिवसातील २० तास कसे काम करू शकतो, या गोष्टी आता डोळ्यांमध्ये खुपत असल्याचे खासदार शिंदे यांनी म्हटले. ही तर फक्त सुरुवात असून 'ये झाकी है, पिक्चर अभी बाकी है' असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

शिंदेसाहेब आता चांगले काम करत आहेत. विरोधकांना पूर्ण वेळ केवळ शिंदेसाहेबच दिसतात. स्वप्नामध्ये पण शिंदे साहेब येतात. शिंदेसाहेब गणेश उत्सवामध्ये ज्या प्रकारे प्रत्येकाच्या घरी फिरले. फक्त गणेश उत्सव नाही, त्याबरोबर शासकीय कामकाजाचे सरकारचे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा माणूस काम कसा करू शकतो? असा प्रश्न विरोधकांना पडला आहे, असेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणालेत.

राज्यात जे सरकार आले ते मेजॉरिटीचे सरकार आहे. बाकी लोक काय बोलत असतात. बोलणे त्यांच कामच आहे. विरोधी बाकावर बसल्यापासून त्यांच्याकडे करण्यासारखे काहीच उरलेले नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर टीका करत असतात, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.

Comments
Add Comment