Home क्रीडा IPL MI VS RR: राजस्थानसाठी करो या मरो, पंजाबच्या प्लेऑफचे स्वप्न आजच्या सामन्यावर अवलंबून

MI VS RR: राजस्थानसाठी करो या मरो, पंजाबच्या प्लेऑफचे स्वप्न आजच्या सामन्यावर अवलंबून

0
MI VS RR: राजस्थानसाठी करो या मरो, पंजाबच्या प्लेऑफचे स्वप्न आजच्या सामन्यावर अवलंबून
MI vs RR

मुंबई : आज आयपीएल 2026 मध्ये अखेरचे दोन साखळी सामने होणार आहेत. आज 24 मे रोजी शेवटचा डबल-हेडर रंगणार आहे. पहिल्या सामन्यात Mumbai Indians आणि Rajasthan Royals यांचायत लढत होणार आहे . हा सामना वानखेडे स्टेडियमवर दुपारी 3:30 वाजता खेळला जाणार आहे.

राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना Do or die आहे. 13 सामन्यांत 14 गुणांसह संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. मुंबईविरुद्ध विजय मिळवला तर राजस्थानचे 16 गुण होतील आणि संघ थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. मात्र पराभव झाल्यास त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

https://prahaar.in/2026/05/24/fifa-2026-mbappe-frances-hopes-on-mbappe/

पंजाबचे प्लेअऑफ़ आव्हान मुंबईवर अवलंबून

या सामन्याच्या निकालाचा परिणाम Punjab Kings वरही होणार आहे. कारण राजस्थानने विजय मिळवल्यास पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न जवळपास संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पंजाबच्या ध्रुष्टीने मुंबईचे विजय अत्यंत महत्वचा आहे.

हेड टू हेड

मुंबई आणि राजस्थान यांच्यात आतापर्यंत 31 सामने झाले आहेत. त्यापैकी मुंबई इंडियन्सने 16 तर राजस्थान रॉयल्सने 15 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजची लढत रोमांचक होण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2026/05/24/pro-wrestling-league-straight-from-the-pro-wrestling-league-to-the-international-arena/

Pitch रिपोर्ट

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. लहान बाउंड्रीमुळे येथे चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. यंदा येथे झालेल्या 5 पैकी 4 सामन्यांत 200 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. मात्र सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना स्विंगची मदत मिळू शकते. हवामान खात्याने मुंबईत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सामन्यात पाऊसाची व्यत्यय येण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2026/05/24/pragyanandas-golden-opportunity-missed/

संभाव्य प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स :

रायन रिकेल्टन, रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, रघु शर्मा.

राजस्थान रॉयल्स :

यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनोवान फरेरा, शुभम दुबे, दसुन शनाका, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, सुशांत मेहता, बृजेश शर्मा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here