छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रविवारी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेली, तर काही भागांत हरभऱ्याएवढ्या गारांचा वर्षाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Marathwada Pre-monsoon Rains)
https://prahaar.in/2026/05/24/ipl-2026-mi-vs-rr-do-or-die-for-rajasthan-punjabs-playoff-dreams-depend-on-todays-match/
जालन्यात गारपिटीचा तडाखा :
जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि अंबड तालुक्यात बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. केळी, पपई आणि आंब्याच्या फळबागांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून गेली असून नागरिकांना मोठा फटका बसला. (Marathwada Pre-monsoon Rains)
https://prahaar.in/2026/05/24/neet-2026-paper-leak-case-yes-i-tore-the-neet-paper-accused-manisha-havaldars-shocking-confession-before-cbi-name-of-nta-officer-also-revealed/
हिंगोलीत नागरिकांची तारांबळ :
हिंगोली जिल्ह्यातील औंढा, वसमतसह अनेक भागांत शनिवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची एकच धांदल उडाली. काही भागांत झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. (Marathwada Pre-monsoon Rains)
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शन होत नसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावत हवामानात मोठा बदल झाला. (Marathwada Pre-monsoon Rains)
बीडमध्ये गारांचा वर्षाव :
https://prahaar.in/2026/05/24/suresh-mapari-big-blow-to-thackeray-group-in-washim-suresh-mapari-grand-entry-into-bjp-with-a-convoy-of-29-vehicles/
नांदेडमध्ये वादळी वाऱ्याने झाडे कोसळली :
नांदेड जिल्ह्यात अचानक हवामान बदलल्याने अनेक भागांत १५ ते २० मिनिटे जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. अनेक वाहनचालकांना रस्त्यावर अडचणींचा सामना करावा लागला. काही भागांत धुळीचे वादळही पाहायला मिळाले. (Marathwada Pre-monsoon Rains)
परभणीत रस्त्यांवर पाणीच पाणी :
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वारे आणि विजांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Marathwada Pre-monsoon Rains)