Home ब्रेकिंग न्यूज NEET-2026 Paper Leak Case : ‘होय, मीच NEET पेपर फोडला!’; आरोपी मनीषा हवालदारची CBI समोर धक्कादायक कबुली, NTA अधिकाऱ्याचं नावही उघड?

NEET-2026 Paper Leak Case : ‘होय, मीच NEET पेपर फोडला!’; आरोपी मनीषा हवालदारची CBI समोर धक्कादायक कबुली, NTA अधिकाऱ्याचं नावही उघड?

0
NEET-2026 Paper Leak Case : ‘होय, मीच NEET पेपर फोडला!’; आरोपी मनीषा हवालदारची CBI समोर धक्कादायक कबुली, NTA अधिकाऱ्याचं नावही उघड?
manisha hawaldar

पुणे : देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर फुटी प्रकरणात आता सर्वात मोठा स्फोटक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) ताब्यात असलेल्या आरोपी मनीषा हवालदार हिने चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तिने केवळ पेपर फोडल्याची कबुलीच दिली नाही, तर हे संपूर्ण रॅकेट कुणाच्या सांगण्यावरून चालत होते याचाही खुलासा केल्याने तपासाला मोठे वळण मिळाले आहे. (NEET-2026 Paper Leak Case)

https://prahaar.in/2026/05/24/suresh-mapari-big-blow-to-thackeray-group-in-washim-suresh-mapari-grand-entry-into-bjp-with-a-convoy-of-29-vehicles/

सूत्रांच्या माहितीनुसार, मनीषा हवालदार हिने सीबीआयसमोर दिलेल्या जबाबात सांगितले की, NEET परीक्षा घेणाऱ्या National Testing Agency (NTA) च्या पॅनलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून प्रश्नपत्रिका बाहेर काढण्यात आली होती. या धक्कादायक दाव्यामुळे आता थेट परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून तपास यंत्रणांनी संबंधित अधिकाऱ्याचा शोध सुरू केला आहे. (NEET-2026 Paper Leak Case)

परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तरे पुरवल्याचा आरोप :

सीबीआयच्या चौकशीत मनीषा हवालदारने कबूल केल्याचे सांगितले जात आहे की, तिने परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे उपलब्ध करून दिली होती. तपास यंत्रणांच्या मते, या प्रश्नपत्रिका आणि माहिती व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवण्यात आली होती. (NEET-2026 Paper Leak Case)

या प्रकरणात मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या संशयित महिलांशी तिचा सतत संपर्क होता. तिघींमध्ये पेपर फुटीबाबत अनेक वेळा संवाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (NEET-2026 Paper Leak Case)

https://prahaar.in/2026/05/24/jammu-and-kashmir-anti-terrorism-operation-major-operation-by-security-forces-in-baramulla-large-explosive-stockpile-seized-from-terrorists-hideout/

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

सीबीआयच्या तपासाचा सुगावा लागताच आरोपीने मोबाईलमधील अनेक व्हॉट्सॲप चॅट्स आणि डेटा डिलीट केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हा डेटा पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तपास यंत्रणांना डिलीट केलेल्या चॅट्समधून आणखी धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (NEET-2026 Paper Leak Case)

घरावर छापा, मोठे पुरावे जप्त :

सीबीआयने मनीषा हवालदारच्या घरावर टाकलेल्या छाप्यात काही संशयास्पद कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि रोकड जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांनी लॅपटॉप, मोबाईल आणि इतर डिजिटल पुरावे ताब्यात घेतले असून त्यातून आणखी विद्यार्थ्यांची नावे आणि पेपर फुटीचे नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे. (NEET-2026 Paper Leak Case)

https://prahaar.in/2026/05/24/eknath-shinde-deputy-chief-minister-eknath-shindes-surprise-visit-to-delhi-important-meeting-with-amit-shah-political-discussions-are-rife/

मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी CBIची पथके रवाना :

या प्रकरणात आता सीबीआयने आपले लक्ष कथित मुख्य सूत्रधाराकडे केंद्रित केले आहे. NTA पॅनलमधील ज्या अधिकाऱ्याचे नाव आरोपीने घेतले आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तपास यंत्रणा वेगाने हालचाली करत आहेत. या अधिकाऱ्याची चौकशी झाल्यानंतर देशभरातील NEET पेपर फुटीच्या रॅकेटचे आणखी धक्कादायक धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (NEET-2026 Paper Leak Case)

दरम्यान, या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (NEET-2026 Paper Leak Case)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here