मुंबई : गुजरात टायटन्स संघाने याआधी पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत सलग दुसऱ्यावर्षी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता गतविजेते गुजरात टायटन्स आणि ४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये रविवारी, २८ मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे.
दोन्ही बाजूला तगडे फलंदाज आहेत. शुभमन गिलसह मिलर, हार्दिक पंड्या, राशिद खान, शिखर भरत असे क्षमतावान फलंदाज गुजरातच्या ताफ्यात आहेत. तर चेन्नईचा संघही यात मागे नाही. देवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी अशी लांबलचक फलंदाजी त्यांच्याकडे आहे.
गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये गुजरात संघाने दमदार कामगिरी केली आहे. ऑरेंज आणि पर्पल कॅप सुद्धा गुजरातकडेच आहे. सांघिक खेळाच्या बळावर गुजरातने फायनलमध्ये धडक मारली आहे.
२६ मे रोजी झालेल्या सामन्यात गुजरातने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरातने मुंबईचा दारुण पराभव केला. या सामन्यात शुभमन गिल याने शतकी खेळी केली. तर मोहित शर्मा याने पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला.
२३ मे रोजी झालेल्या क्वालिफायर १ च्या सामन्यात गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने गुजरातचा १५ धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.
> ३१ मार्च – पहिल्याच सामन्यात गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला.
> ३ एप्रिल – चेन्नईने लखनऊवर रोमहर्षक विजय मिळवला.
> ४ एप्रिल – गुजरातने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला.
> ८ एप्रिल – चेन्नईने मुंबईचा सात विकेट्स राखून पराभव केला.
> ९ एप्रिल – कोलकात्याने गुजरातचा तीन विकेटने पराभव केला.
> १२ एप्रिल – राजस्थानचा चेन्नईवर ३ धावांनी रोमांचक विजय
> १३ एप्रिल – गुजरातने पंजाबचा सहा विकेटने पराभव केला.
> १६ एप्रिल – राजस्थानने गुजरातचा तीन विकेटने पराभव केला.
> १७ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्सची आरसीबीवर बाजी.
> २१ एप्रिल – चेन्नईचा हैदराबादवर ७ विकेट राखून सुपर विजय.
> २२ एप्रिल – गुजरातचा लखनऊवर सात धावांनी विजय.
> २३ एप्रिल – चेन्नईचा कोलकात्यावर ४९ धावांनी सहज विजय.
> २५ एप्रिल – गुजरातचा मुंबईवर ५५ धावांनी विजय.
> २७ एप्रिल – ‘चेन्नई एक्स्प्रेस’ रोखण्यात राजस्थान यशस्वी.
> २९ एप्रिल – गुजरातने कोलकाताचा सात विकेटने पराभव केला.
> ३० एप्रिल – पंजाबचा चेन्नईवर रोमांचक विजय.
> २ मे – दिल्लीने गुजरातला पाच धावांनी हरवले.
> ५ मे – गुजरातने राजस्थानवर नऊ विकेटने विजय मिळवला.
> ६ मे – चेन्नईने केला मुंबईचा सहा विकेटने पराभव.
> ७ मे – गुजरातने लखनऊचा ५६ धावांनी पराभव केला.
> १० मे – चेन्नईकडून दिल्ली सर
> १२ मे – मुंबईने वानखेडेवर गुजरातचा २७ धावांनी पराभव केला.
> १४ मे – कोलकाताचा चेन्नईवर ६ विकेट राखून सहज विजय.
> १५ मे – गुजरातने केला हैदराबादचा पराभव.
> २० मे – दिल्लीला झुकवत चेन्नईची आगेकूच.
> २१ मे – अखेरच्या साखळी सामन्यात गुजरातने आरसीबीचा पराभव केला.
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…