Sunday, May 12, 2024
Homeक्रीडाIPL 2024चेन्नईचा सात विकेट्सने विजय

चेन्नईचा सात विकेट्सने विजय

वानखेडेवर मुंबईचे गर्वहरण

मुंबई (प्रतिनिधी) : वानखेडे स्टेडियमच्या म्हणजे घरच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा सात विकेट्स राखून पराभव करत वस्त्रहरण केले. आधी गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवले, त्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची खूप धुलाई केली. मुंबईने दिलेले १५८ धावांचे माफक आव्हान चेन्नईने सात विकेट आणि ११ चेंडू राखून आरामात पार केले. मराठमोळ्या अजिंक्य राहणे याने या सामन्यात झंझावाती फलंदाजी केली. तर रविंद्र जाडेजाने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आयपीएलच्या १६ व्या हंगामातील चेन्नईचा हा दुसरा विजय ठरला तर मुंबईचा दुसरा पराभव होय.

मुंबईकर अजिंक्य रहाणे याने वानखेडेच्या मैदानावर झंझावाती फलंदाजी केली. अजिंक्यने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावत मुंबईच्या गोलंदाजीची हवा काढली. चेन्नईकडून अजिंक्य रहाणे याने आज आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच अजिंक्यने दमदार कामगिरी केली. मुंबईने दिलेल्या १५८ धावांच्या माफक आव्हानाच पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. डेवॉन कॉनवे शून्यावर बाद झाला. त्यामुळे पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे मैदानावर आला. त्यानंतर अजिंक्य रहाणे याने सामन्याचे चित्र बदलले. अजिंक्य याने वानखेडे मैदानावर चोहोबाजूने फटकेबाजी केली. त्याने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने ३ षटकार आणि ७ चौकारांचा पाऊस पडाला. अजिंक्य फलंदाजी करताना भन्नाट फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाडही बघ्याच्या भूमिकेत होता. अजिंक्य रहाणेने २७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. ऋतुराजसोबत त्याने ८२ धावांची भागिदारी केली, यामध्ये अजिंक्य रहाणेचा वाटा ६१ धावांचा होता.

ऋतुराजची नाबाद खेळी…

ऋतुराज गायकवाड याने सयंमी फलंदाजी करत चेन्नईला विजय मिळवून दिला. ऋतुराज गायकवाड याने ३५ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. ऋतुराज याने सुरुवातीपासूनच एक बाजू लावून धरत विजय मिळवून दिला. आधी अजिंक्य राहणेसोबत भागिदारी करत विजयाचा पाया रचला.

रोहित-ईशानची विस्फोटक सुरुवात

कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मुंबईला विस्फोटक सुरुवात करुन दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडला. ४ षटकात ३८ धावांची सलामी दिली. पण रोहित शर्मा २१ धावांवर बाद झाल्यानंतर मुंबईची फलंदाजी ढासळली. रोहित शर्माने १३ चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या. तर ईशान किशन याने २१ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -