Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीNCRB Report: देशात अपहरणाची १ लाखाहून अधिक प्रकरणे, या राज्यात सर्वाधिक आत्महत्या

NCRB Report: देशात अपहरणाची १ लाखाहून अधिक प्रकरणे, या राज्यात सर्वाधिक आत्महत्या

नवी दिल्ली: भारतात २०२२ या वर्षात अपहरणाची एक लाखाहून अधिक प्रकरणे दाखल करण्यात आली. या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या स्ानावर आहे. एनसीआरबीच्या आकड्यांवरून ही माहिती समोर आली.

ऱाष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार देशात अपहरणाची दिवसाला २९४हून अधिक तर प्रत्येक तासाला १२ हून अधिक प्रकरणे दाखल करण्यात आले. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार २०२२मध्ये देशात प्रति एक लाख लोकसंख्येनुसार गुन्ह्याचा दर ७.८ टक्के इतका होता. तर अशा गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल करण्याचा दर ३६.४ टक्के होता.

कुठे किती प्रकरणे?

केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या एनसीआरबीच्या माहितीनुसार २०२२मध्ये देशात अपहरणाची १,०७,५८८ प्रकरणे दाखल झाली. गेल्या वर्षी हा आकडा १०१,७०७ आणि २०२०मध्ये ८४,८०५ होता. एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार दिल्लीत २०२२मध्ये अपहरणाची ५६४१, २०२१मध्ये ५,५२७ आणि २०२०मध्ये ४,०६२ प्रकरणे दाखल करण्यात आली. उत्तर प्रदेशात २०२२मध्ये अपहरणाचे सर्वाधिक १६, २६२ प्रकरणे दाखल झाली.

आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक कुठे?

एनसीआरबीच्या ताज्या रिपोर्टनुसार सिक्कीममध्ये आत्महत्येचा दर सर्वाधिक आहे. रिपोर्टनुसार सिक्कीमध्ये प्रति एक लाख लोकसंख्येनुसार आत्महत्येचा दर ४३.१ टक्के इतका आहे. यानंतर अंदमान आणि निकोबार बेटावर ४२.८ टक्के, पाँडिचेरीमध्ये २९.७ टक्के, केरळमध्ये २८.५ टक्के आणि छत्तीसगडमध्ये २८.२ टक्के आहे.

देशात आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण

देशभरात २०२२मध्ये एकूण १,७०,९२४ जणांनी आत्महत्या केल्या. रिपोर्टनुसार सिक्कीमध्ये २०२२मध्ये २९३ आत्महत्येची प्रकरणे समोर आली. २०२१च्या तुलनेत ही संख्या २७ ने अधिक आहे. सिक्कीममध्ये एकूण २२६ पुरुष आणि ६७ महिलांनी आत्महत्या केली. गेल्या वर्षी या राज्यात आत्महत्येचे हे अधिक प्रमाण बेरोजगारीमुळे झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -