Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीChaitya Bhoomi Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनादिवशी लोक चैत्यभूमीला का जातात?

Chaitya Bhoomi Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनादिवशी लोक चैत्यभूमीला का जातात?

आजही चैत्यभूमीवर उसळली गर्दी…

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६ डिसेंबर या पुण्यतिथीला महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) असे संबोधले जाते. आज आंबेडकरांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतासह जगभरात आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन केले जात आहे. अनेक बौद्धधर्मीय या दिवशी दादरच्या चैत्यभूमीला जातात. त्यामुळे या दिवशी दादरमध्ये नेहमीपेक्षा प्रचंड गर्दी पाहायला मिळते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला दादरमधील राजगृहावर (Rajgruha) आणण्यात आले. शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील समुद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला.

निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्त्व’ मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. भारताच्या सर्व प्रांतातून २५ लाखांहून अधिक बौद्धांचा जनसमुदाय मुंबई येथील चैत्यभूमी (Chaitya Bhoomi), शिवाजी पार्क येथे आंबेडकरांना श्रद्धांजली व आदरांजली अर्पण करण्याकरिता दरवर्षी १ डिसेंबरपासूनच यायला सुरुवात होते.

दरवर्षी येणाऱ्या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मूर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे, स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात.

आजही चैत्यभूमीवर उसळली गर्दी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील भीम अनुयायी दादरमध्ये दाखल झाले आहेत. महापालिकेने शिवाजी पार्क येथे त्‍यांच्या राहण्याची व्यवस्था केली असून अनेक कुटुंबे येथे विसावली आहेत. महापालिकेसह विविध सामाजिक संघटनांनी पाण्यासह अल्पोपाहाराची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी सकाळ व संध्याकाळचा नाष्टा तसेच जेवणाची मोफत व्यवस्था आहे. काही संघटनांनी आरोग्य तपासणी शिबिरे सुरू केली आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, नेत्रचिकित्सा केली जात आहे.

अनेक अनुयायी पुस्तकांच्या दुकानांवर गर्दी करत असल्‍याचे दिसत आहे. भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुस्तकांबरोबरच संविधानाला अधिक मागणी आहे. बेस्ट प्रशासनाकडून विविध सुविधांसह मोफत पुस्तकवाटप केले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -