Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडी'गणेशोत्सवापूर्वी मुंबई -गोवा महामार्ग निर्धोक करा'

‘गणेशोत्सवापूर्वी मुंबई -गोवा महामार्ग निर्धोक करा’

राज्यमार्गांनाही खड्डेमुक्त करा: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले निवेदन

मुंबई : गणेशोत्सवात गावात पोहोचायला हवे यासाठी चाकरमान्यांना वेध लागले आहेत.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट घेऊन मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीची गंभीरपणे नोंद घ्यावी.गावागावात जाणारे राज्यमार्गही खड्डेमुक्त व्हावेत यासाठी विशेष मोहिम हाती घेण्याची मागणी केली आहे. तसे निवेदनही मुख्यमंत्र्यांना नारायण राणे यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कार्यवाही होणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले.

नारायण राणे निवेदनात म्हणतात, संपूर्ण कोकणपट्ट्यात उत्साहाने व आनंदाने साजरा केला जाणारा गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. मुंबई व परिसरात नोकरी- व्यवसाय करणारे लाखो चाकरमानी कोणत्याही अडचणी न जुमानता गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील आपल्या गावांकडे धाव घेतात व त्यासाठी मुख्यतः मुंबई – गोवा महामार्गाचा (एन्- एच्. ६६) वापर करतात.

मुंबई-गोवा महामार्गाची सद्यस्थिती अतिशय दयनीय आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या महामार्गावर खड्ड्यांचे जाळे पसरले असून महामार्गाची चाळण झाली आहे. महामार्गाच्या या स्थितीमुळे राज्यभरातून कोकणात जाणा-या प्रवाशांचे हाल होणार असून अपघातही होऊ शकतात.

वरील परिस्थिती लक्षात घेता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या व नंतर परतणाऱ्या प्रवाश्यांचा प्रवास विना अडथळा व सुरक्षिततेने पार पडावा या दृष्टीने गणेशोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी तातडीने मुंबई – गोवा महामार्गाची ( एन्. एच्. ६६) दुरुस्ती व सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत.अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -