Wednesday, June 26, 2024
Homeताज्या घडामोडीMobile: दिवसभरात किती तास वापरला पाहिजे मोबाईल फोन? तुम्हाला माहीत आहे का...

Mobile: दिवसभरात किती तास वापरला पाहिजे मोबाईल फोन? तुम्हाला माहीत आहे का…

मुंबई: आजच्या काळात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संपूर्ण दिवस हल्ली सगळेच मोबाईलवर असतात. जर एक मिनिटही फोन आपल्या हातात नसेल तर असे वाटते की आपण काही विसरलो आहोत. फोनशिवाय तर अनेकांना चैनही पडत नाही. आपल्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

मात्र तुम्हाला माहीत आहे का प्रमाणापेक्षा अधिक मोबाईल वापरणेही अतिशय धोकादायक आहे. यामुळे आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होत आहेत. तर दररोज किती तास मोबाईल वापरला पाहिजे हे जाणून घ्या…

मुलांसाठी तसेच किशोरावस्थेतील मुलांसाठी

तज्ञांच्या म्हणण्यानुसार मुले तसेच किशोरवयीन मुलांनी दिवसातून २ तासांपेक्षा अधिक मोबाईलचा वापर करू नये. जास्त फोन पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. तसेच त्यांची झोपही खराब होऊ शकते. याशिवाय त्यांच्या शारिरीक विकासावरही परिणाम होतो.

वयस्कर लोकांसाठी

वयस्कर लोकांनी दिवसांतून ३ ते ४ तास मोबाईल वापरणे हे योग्य मानले जाते. दरम्यान ही वेळ काम आणि त्यांच्या गरजानुसार बदलू शकते. जर दिवसभर तुमचे काम फोन तसेच कम्प्युटरवर असेल तर मध्ये मध्ये ब्रेक घेतला पाहिजे. डोळ्यांना आराम दिला पाहिजे. जास्त फोनच्या वापरामुळे डोळ्यांना थकवा, डोकेदुखी तसेच तणाव येऊ शकतो.

वयोवृद्धांसाठी

वयोवृद्ध लोकांनी फोनचा वापर मर्यादित केला पाहिजे. खासकरून ज्यांना डोळ्यासंबंधित आजार आहेत. त्यांनी दिवसांतून एक ते दोन तास वापर करणे ठीक असू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -