Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीLS Elections 2024 : याकूब मेमनची कबर सांभाळणा-या काँग्रेस आणि खोट्या शिवसेनेला...

LS Elections 2024 : याकूब मेमनची कबर सांभाळणा-या काँग्रेस आणि खोट्या शिवसेनेला धडा शिकवा

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परभणीतून एल्गार

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या (LS Elections 2024) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौ-यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधत काँग्रेसला धारेवर धरले. तसेच काँग्रेसला साथ देणा-या आणि याकूब मेमनची कबर सांभाळण्यात व्यस्त असलेल्या खोट्या शिवसेनेला धडा शिकवण्याचे आवाहन मोदी यांनी तमाम जनतेला केले आहे.

महायुतीमधील राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची परभणीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीमध्ये केली. ‘परभणीकरांना माझा राम राम’ म्हणत त्यांनी (PM Narendra Modi) भाषणाला सुरुवात केली.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला. शेतीवर अवलंबून असलेला हा प्रदेश असून यापूर्वी काँग्रेस आणि इंडी आघाडीने कधी तुमचे दुःख जाणून नाही घेतले. जलयुक्त शिवार सारख्या योजना सुरु झाल्या होत्या. मात्र इंडी आघाडीवाल्यांनी या योजना थांबवल्या. विकसित महाराष्ट्र हवा असेल तर इंडी आघाडीपासून खूप सतर्क रहावं लागणार आहे. काँग्रेस हा असा वेल आहे ज्यांची कोणती स्वतःची मुळं नाही आणि त्यांची जमिनही नाही. या वेलीला जे कोणी आधार देईल ती त्यांनाच वाळवून टाकणारी आहे. देशाच्या स्वातंत्र्यावेळी काँग्रेसने देशाचे विभाजन केल्याचा आरोपही मोदी यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर काश्मीरचा प्रश्न निर्माण केला. ३७०चे कारण सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान काश्मीरमध्ये लागू केले नाही.

इकडे महाराष्ट्रातही इंडी आघाडीने जोपर्यंत सरकार चालवले तोपर्यंत निजामची सत्ता गेली आहे असे कधी वाटलेच नाही. काँग्रेस आणि खोटी शिवसेना ही त्यावेळी याकूब मेमन याची कबर सांभाळण्यामध्ये व्यस्त होती. या लोकांनी महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा विकास होऊ दिला नाही, असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर केला.

मोदी म्हणाले, तुम्ही दाखवलेल्या विश्वासातून मी विकास करुन दाखवेन. २०२४ची ही निवडणूक फक्त सरकार बनवण्यासाठी नाही तर या निवडणुकीतून भारताला विकसित करण्याचे ध्येय आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचे मुद्दे साधारण नाही. प्रत्येक पाऊल आणि संकल्प महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे ही पहिली निवडणूक असेल जी भारताला जगभरातील तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था करण्यासाठी होत आहे. अवघ्या १० वर्षांमध्ये देशाने विकासाचा मोठा पल्ला गाठला आहे. २०१४ पूर्वी आतंकवादी हल्ल्याची भीती, बॉम्ब हल्ला आणि शहीद जवानांचा त्रास, अशा गोष्टींची चर्चा सर्वत्र होत होती. त्यानंतर आता अशा हल्ल्यांची चर्चा बंद झाली, असे नरेंद्र मोदी भाषणामध्ये म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -