Friday, May 3, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सInsurance Policy : विमा पॉलिसीत दोन कोटींचा घाटा

Insurance Policy : विमा पॉलिसीत दोन कोटींचा घाटा

  • गोलमाल : महेश पांचाळ

मुंबईजवळील कामोठे येथील व्यापारी रहिवाशाची विमा पॉलिसीत फसवणूक करून त्याच्याकडून दोन कोटी २४ रुपये लुबाडण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. गेल्या तीन वर्षांत कशा प्रकारे या व्यापाऱ्याला फसविण्यात आले, याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. विमा ग्राहक म्हणून त्याला ऑगस्ट २०२० पूर्वी विमा नियामक एकात्मिक तक्रार व्यवस्थापन प्रणालीकडून एक फोन आला होता. संबंधित व्यक्तीने तक्रारदार विमा ग्राहकाला विमा पॉलिसी मुदतपूर्व बंद करून ५८ लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. ऑगस्ट २०२० ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत विमा ग्राहकाकडे अनेक प्रक्रियात्मक शुल्क आणि करांच्या बहाण्याने पैसे मागितले गेले. या करापोटीची रक्कम दोन कोटी २४ लाख झाली होती. ५८ लाख रुपये मिळणार म्हणून गेल्या तीन वर्षांत त्याने सव्वादोन कोटी पैसे गमावले आहेत, हे त्याच्या लक्षात आले; परंतु फार उशीर झाला होता. संबंधित तक्रार व्यवस्थापन प्रणालीकडे स्वत पाठपुरावा केल्यानंतर अशा स्वरूपाचा कोणताही कर भरल्याची नोंद विमा पॉलिसीच्या कार्यालयात झाली नसल्याची माहिती मिळाली. हे ऐकून तक्रारदार विमा ग्राहकाला धक्का बसला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे; परंतु कोणाला अटक झालेली नाही. अशा पद्धतीनेही लोकांची फासवणुक होते हा नवा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे; परंतु आरोपींचा शोध लागला, तर या प्रकरणातील आरोपींची मोंडस ऑपरेंडीसमोर येऊ शकते. विमा पॉलिसीधारकांनी आता अशा पद्धतीने फसविणारी टोळी कार्यरत आहे, हे ध्यानात ठेवायला हवे.

पहिले लग्न लपवून दुसऱ्या पत्नीची फसवणूक खारघरमध्ये राहणाऱ्या आणि औषध कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचे वय होते ३४. लग्नाचे वय उलटून जाऊ नये यासाठी तिने मॅट्रिमोनिअल साइटवर नोंदणी करण्याचे ठरविले. त्यानुसार एका वेबसाइटवर नोंदणी केली. या वेबसाइटवर हिम्मतसिंग चौधरीबाबतची माहिती वाचून त्याच्यासोबत भावी आयुष्यासंदर्भात तिने फोनवरून चर्चा केली. चौधरी याने आपण लष्करी अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच सध्या भारताच्या गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) या संस्थेमध्ये काम कार्यरत असल्याची माहिती दिली होती. दोघांचे विचार जुळल्यानंतर त्यांनी २०२१ मध्ये लग्न केले. लग्नानंतर सहा महिन्यांनंतर नवऱ्याच्या वागण्यात थोडा बदल तिला दिसला. तो कामाचे निमित्त सांगून अनेक रात्रंदिवस बाहेर असायचा. घर आल्यानंतर गोड बोलून त्याने तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन वर्षांत चौधरीने तिच्याकडून तीन लाख रुपये घेतले होते, तर तिचे चार लाख रुपये किमतीचे दागिने गहाण ठेवायला सांगितले. हे पैसे मिळाल्यानंतर चौधरी यांनी तिचा छळ सुरू केला, असे तिच्या महिलेचे म्हणणे आहे. याबाबत नवी मुंबईतील खारघर पोलिसांनी ३५ वर्षीय चौधरीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकारात आणखी धक्कादायक माहिती तिला समजली की, चौधरी याचे पहिले लग्न झाले होते. विवाहित असतानासुद्धा ती माहिती लपवून दुसऱ्या महिलेसोबत लग्न जुळवल्याचा आणि तिची आर्थिक फसवणूक केल्याचा चौधरी यांच्यावर आरोप आहे.

maheshom108@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -