Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीJyoti Amge : नागपुरात दोन फुटांच्या महिलेने केले मतदान!

Jyoti Amge : नागपुरात दोन फुटांच्या महिलेने केले मतदान!

व्हिडीओ पोस्ट करत नागरिकांना केलं मतदानाचं आवाहन 

मुंबई : देशभरात आजपासून मतदानाचा (Voting) पहिला टप्पा सुरु झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रात विदर्भातील (Vidarbha) रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांत मतदान होत आहे. तर देशातील १०२ जागांवर आज मतदान पार पडणार आहे. यात दोन फूट उंची असलेल्या ज्योती आमगे (Jyoti Amge) हिने नागपूर (Nagpur) येथे मतदान केले आहे. बोटावर शाई असलेला हात उंचावत तिने मतदान केल्याचा फोटो पोस्ट केला आहे. यातून तिने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

ज्योती ही जगातील सर्वात कमी उंचीची महिला आहे. तिचे सोशल मीडियावर १.६ मिलीयनहून अधिक फॉलोवर्स आहेत. सध्या ती ३० वर्षांची आहे. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे फोटोज टाकत असते. ‘नागपूर टुडे’ या चॅनलने ज्योतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे असं आवाहन करताना दिसते. ज्योतीसोबत तिच्या कुटुंबियांनी देखील मतदान केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avani (@avaniarya)

काय आहे ज्योतीची कहाणी?

नागपूरमध्ये जन्मलेल्या ज्योती किसनजी आमगे हिची जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद आहे. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत ती सरासरी उंचीची होत्या. त्यानंतर तिला ॲकॉन्ड्रोप्लासिया नावाचा आजार झाला. ज्यामुळे एका विशिष्ट उंचीच्या पुढे तिची उंची वाढली नाही.

ज्योती २००९ मध्ये जागतिक स्तरावर प्रकाशझोतात आली, जेव्हा ती फ्युजी टिव्हीच्या एक कार्यक्रमात दिसली. त्यानंतर ती त्याच वर्षी मिका सिंगच्या एका गाण्यासाठी व्हिडिओमध्ये दिसली. तिने चॅनलचार डॉक्युमेंट्री बॉडीशॉकमध्ये ती दिसली. या शोमध्ये डॉक्टरांनी तिची उंची मोजली असता, ती फक्त ६१.९५ सेंटीमीटर म्हणजेच सुमारे दोन फूट उंचीची असल्याचे आढळून आले, ज्यामुळे तिला सर्वात लहान जगातील सर्वात लहान महिला म्हणून मान्यता मिळाली. उल्लेखनीय म्हणजे तिचे वजन फक्त पाच ते साडेपाच किलो होते.

ज्योती ऑगस्ट २०१४ मध्ये “अमेरिकन हॉरर स्टोरी: फ्रीक शो” च्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. २०१८ मध्ये इजिप्तच्या गिझा शहरातील पिरॅमिड्ससमोर,आठ फूट आणि नऊ इंच उंच असलेल्या तुर्कीतील सुलतान कोसेन या जगातील सर्वात उंच पुरुषासोबत उभी दिसली होती. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी इजिप्शियन टुरिझम प्रमोशन बोर्डाने या दोघांना इजिप्तमध्ये आमंत्रित केले होते. तिचा स्वतःचा पुतळा लोणावळा (पुणे) येथील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -