Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाIPL 2024IPL 2024: मुंबई इंडियन्सने पकडला विजयाचा वेग, बुमराहनंतर सूर्या, इशानचा कहर

IPL 2024: मुंबई इंडियन्सने पकडला विजयाचा वेग, बुमराहनंतर सूर्या, इशानचा कहर

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२४मध्ये(indian premier league 2024) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने विजयाचा वेग हाती घेतला आहे. त्यांनी गुरूवारी आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला.

मुंबईच्या विजयाचे हिरो वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार फलंदाज इशान किशन ठरले. याआधी बुमराहने ५ विकेट घेत आरसीबीला उद्ध्वस्त केले. त्यानंतर इशान आणि सूर्याने जबरदस्त अर्धशतक ठोकत मुंबईला विजय मिळवून दिला.

या हंगामातील मुंबईच्या ५ सामन्यांतील त्यांचा हा दुसरा विजय आहे. या संघाने हंगामातील सुरूवातीच तीन सामने हरले होते. मात्र आता सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीच्या संघाचा ६ सामन्यांतील हा ५ वा पराभव आहे.

इशानने सूर्याने ठोकले अर्धशतक

सामन्यात मुंबईला विजयासाठी १९७ धावांचे आव्हान मिळाले होते. याच्या प्रत्युत्तरादाखल या संघाने ३ विकेट गमावत १५.३ षटकांत सामना आपल्या नावे केला. मुंबईसाठी सलामीवीर इशान किशनने ३४ बॉलमध्ये ६९ धावांची खेळी केली. यानंतर सूर्यकुमार यादवने १७ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. तो १९ बॉलमध्ये ५२ धावा करत बाद झाला.

तर रोहित शर्माने २४ बॉलमध्ये ३८ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्या ६ बॉलमध्ये २१ धावा केल्या आणि षटकार ठोकत विजय मिळवून दिला. आरसीबीसाठी कोणताही गोलंदाज कमाल करू शकला नाही. सगळ्यांनी मुंबईसमोर गुडघे टेकले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -