Sunday, May 5, 2024
Homeमहत्वाची बातमीभारतीय विद्यार्थ्यावर ऑस्ट्रेलियात चाकू हल्ला

भारतीय विद्यार्थ्यावर ऑस्ट्रेलियात चाकू हल्ला

११ वार केल्याने प्रकृती चिंताजनक

सिडनी (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर वर्णद्वेषी हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शुभम गर्ग असे या तरुणाचे नाव असून तो अवघ्या काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाला गेला होता. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका २७ वर्षीय संशयिताला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा सगळा प्रकार सिडनीमध्ये घडल्याचे वृत्त आहे. सिडनीच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स’मध्ये शुभम गर्ग मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडीचे शिक्षण घेत होता. शुभम याने आयआयटी मद्रासमधून बीटेक आणि एमएससीचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी तो ऑस्ट्रेलियाला गेला. एक सप्टेंबर रोजी शुभम सिडनीमध्ये दाखल झाला होता. मात्र, अवघ्या दोन आठवड्यांत त्याच्यावर हा हल्ला झाला.

शुभम गर्गवर हल्लेखोराने चाकूचे ११ वार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यात त्याचा चेहरा, छाती आणि पोटावर गंभीर जखमा झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. शुभमवर सध्या सिडनीमधील एका रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. शुभमचे कुटुंबीय आग्र्यामध्ये राहतात. हा हल्ला वर्णद्वेषातूनच करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -