Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीleprosy : जगातील सर्व कुष्ठपिडीतांपैकी भारतात ५८ टक्के रुग्ण

leprosy : जगातील सर्व कुष्ठपिडीतांपैकी भारतात ५८ टक्के रुग्ण

माजी राज्यपाल राम नाईक यांची माहिती

अलिबाग : भारतातील कुष्ठपिडीतांचा (leprosy) प्रश्न गंभीर असून, जगाचा विचार केल्यास जगातील सर्व कुष्ठपिडीतांपैकी भारतात ५८ टक्के रुग्ण असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी आज येथे बोलताना दिली.

आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग (leprosy) निवारण संस्था, पुणे आणि सहायक संचालक कुष्ठरोग, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कोकोनट हॉटेल आयव्ही रिसॉर्टच्या सभागृहात `कुष्ठरोग जनजागृती आणि मानवाधिकार’ या विषयावर आधारित ४ व ५ एप्रिल अशी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचा शुभारंभ माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते गुरुवारी ४ एप्रिलला करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी पनवेल येथील शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीचे ट्रस्टी उदय ठकार, आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण संस्थेचे कार्यकारी संचालक शरद भोसले, ट्रस्टी आनंद नवाथे, मानद सचिव मिथीला गोखले, सहायक संचालक आरोग्य सेवा विभागाचे अवैद्यकीय पर्यवेक्षक भगवान जाधव, अन्य मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कुष्ठपिडीत दोन प्रकारात मोडतात. एक म्हणजे स्वर्गीय बाबा आमटे यांच्यासारख्या आश्रमाची, तर दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे कुष्ठरोगी होय. कुष्ठरोगींच्या झोप़डपट्टीत असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी, शौचालये, वीज, पायवाटा, घरांचा दर्जा, शिक्षण, आरोग्य सेवा अशाप्रकारचे प्रश्न आहेत. अशा झोपड़पट्ट्या देशात जवळजवळ ८०० असून, झोपडपट्ट्यांमधील प्रश्न अधिक गंभीर आहेत, तर आश्रमांचे प्रश्न वेगळ्या प्रकारचे आहेत. त्यांना दिले जाणारे काम, व्यवसायासाठी शिक्षण आणि नोकऱ्या इत्यादी प्रश्न आहेत.

जगातील जगातील सर्व कुष्ठपिडीतांपैकी भारतात ५८ टक्के रुग्ण असल्याने भारताला कुष्ठरोगाची राजधानी समजले जाते. त्यामुळे देशातील अन्य राज्यांतील कुष्ठपिडीतांना एकत्र करून हा प्रश्न आपण दिल्लीच्या व्यासपिठावर नेला. व्यंकय्या नायडू या समितीने देशभर दौरा करून कुष्ठपिडीतांच्या वस्त्यांची पहाणी केली आणि त्याचा अहवाल समितीने २४ ऑक्टोबर २००८ रोजी राज्यसभेला दिला. या अहवालावर सरकारने काय काम केले. याचा ऍक्शन रिपोर्ट २२ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यसभेला दिला. या अहवालाच्या आधारावर जीवनभत्ता (पेन्शन) सुरु झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्वांना चार लाखांची घरे देण्याची योजनाही मंजूर केली होती; परंतू सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे प्रत्यक्ष या कामास सुरवातच झाली नसल्याची खंत श्री. नाईक यांनी यावेळी बोलून दाखविली.

आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण संस्थेचे कार्यकारी संचालक शरद भोसले यांनी आपल्या प्रास्तविकात राम नाईक यांनी याकामी अनेकवेळा सहकार्य केल्याचे सांगताना कुष्ठरोगाचे प्रश्न खुप कठीण असल्याचे सांगितले. गैरसमज, अज्ञाना, कुष्ठरोग लपविण्याच्या प्रकारामुळे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधताना आशा वर्कर यांना अडचण येत असते. रायगड जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण कमी झाले असे वाटत असतानाच, दुसरीकडे उपलब्ध माहितीनुसार सर्व्हेअंती रायगड जिल्ह्यात २५ हजार रुग्ण सापडल्याचे भोसले यांनी सांगितले. सर्व्हेच्यावेळी कुष्ठरोगी वस्तीत जाऊन माहिती घेतली असता, त्यांचे अनेक प्रश्न अजुनही प्रलंबित आहेत, तसेच कुष्ठरुग्णांमध्ये दोन प्रकार पहायला मिळतात. शारिरिकबरोबरच मानसिक आजाराचा त्यात समावेश आहे. या दोन्हीपैकी मानसिक आजार खुप कठीण असून, मानसिक आजारामुळे कुष्ठरोगी खचून जात असल्याचेही भोसले म्हणाले. सहायक संचालक आरोग्य सेवा विभागाचे अवैद्यकीय पर्यवेक्षक भगवान जाधव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -