Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीPrasad Oak : आनंद दिघेंनंतर प्रसाद ओकने व्यक्त केली 'या' राजकारण्याची भूमिका...

Prasad Oak : आनंद दिघेंनंतर प्रसाद ओकने व्यक्त केली ‘या’ राजकारण्याची भूमिका करण्याची इच्छा

महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथी करणारा हा राजकारणी कोण?

मुंबई : प्रसाद ओक (Prasad Oak) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता (Marathi actor) आहे. आजवर अनेक चित्रपटांतून त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. कच्चा लिंबू, हिरकणी, चंद्रमुखी, यांसारख्या चित्रपटांतून त्याने दिग्दर्शक म्हणूनही चोख कामगिरी बजावली आहे. त्याने धर्मवीर (Dharmaveer) या चित्रपटात साकारलेली आनंद दिघे (Anand Dighe) यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. प्रसाद ओकला पाहिल्यानंतर त्याची धर्मवीरांची भूमिका आपसूकच आठवते. यानंतर एका मुलाखतीत प्रसादने कोणावर बायोपिक बनवायला आवडेल या प्रश्नाचं उत्तर देताना आपली एक सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाटा असलेल्या एका राजकारण्याची भूमिका करायला आवडेल, असं तो म्हणाला आहे.

प्रसाद ओकने उत्तर दिलं की, मला सदाशिवराव पेशवेंची भूमिका साकारायला आवडेल. अण्णा हजारे, वपु काळे, जब्बार पटेल यांचीही भूमिका साकारायला आवडेल. विशेष मला शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांची देखील भूमिका करायला आवडेल. त्यांचा बायोपिक देखील दिग्दर्शित करण्याची माझी इच्छा आहे. ते महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्याच्या या उत्तरामुळे भविष्यात प्रसाद शरद पवार यांच्यावर आधारित सिनेमा करताना दिसणार का, हे पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

प्रसाद ओकचा पहिला सिनेमा म्हणजे बॅरिस्टर. या सिनेमासह त्याने ऐका दाजिबा, एक डाव धोबी पछाड, लगे रहो मुन्नाभाई, कलियुग, जेहेर, जोशी की कांबळे, पकडापकडी, हरी माझी घरी, हिप हिप हुर्रे, खेळ मांडला, निर्मला, धतिंग धिंगाणा, बाळकडू, डॉक्टर रमाबाई, ७ रोशन व्हिला, शिकारी, आणि डॉ काशिनाथ घाणेकर, ये रे ये रे पैसा, पिकासो, हिरकणी, धुरळा अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या. सहाय्यक दिग्दर्शक ते आघाडीचा अभिनेता व दिग्दर्शक हा प्रसाद ओकचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -