Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाIND vs AUS: बंगळुरूत आज भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया

IND vs AUS: बंगळुरूत आज भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया

बंगळुरू: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना बंगळुरूत खेळवला जाणार आहे. येथील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आज संध्याकाळी ७ वाजता दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. या मालिकेतील गेल्या चार सामन्यांत ज्या पद्धतीने धावांचा पाऊस पडला आहे त्यापेक्षा अधिक धावा आजच्या सामन्यात बरसू शकतात.

गेल्या काही वर्षात येथील मैदाना फलंदाजांसाठी अतिशय फायदेशीर ठरले आहे. येथील पिच सपाट आहे ज्यामुळे बॉलवर सोप्या पद्धतीने बॅटवर येतो. बाऊंड्रीज लहान आहे या कारणामुळे फलंदाजाला सिक्सर ठोकण्यात भीती वाटत नाही. येथील टी-२० दोनशेहून अधिकचा स्कोर बनणे शक्य आहे. या पिचवर धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणे कठीण नाही.

कशी असेल पिच?

आजच्या सामन्यात पिचची स्थिती अशीच काहीशी असेल. सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असेल आणि हवामानातही आर्द्रता असेल. यामुळे वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळू शकते. मात्र आर्द्रतेमुळे हे प्रमाण कमी असेल. या मैदानावर गेल्या आयपीएलच्या १४ सामन्यांत पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने ९ वेळा १८०हून अधिक स्कोर पार केला आहे. विश्वचषक २०२३मध्येही येथे चौकार-षटकारांचा पाऊस पडला. आजच्या सामन्यातही हेच चित्र पाहायला मिळू शकते.

येथे चेज करणे होईल सोपे

या मैदानावर आतापर्यंत आठ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यातील एक सामना अनिर्णीत राहिला. सात सामने येथे पार पडले आहेत त्यात चेज करणारा संघ अधिक यशस्वी ठरला. पाच सामन्यात नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळाले आहेत.

टीम इंडियाला ३-१ अशी विजयी आघाडी

भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आधीच ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. म्हणजेच भारताने आधीच ही मालिका आपल्या नावे केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -