Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीegg yolk: अंड्यामधील पिवळे बलक खाल्ल्याचे फायदे की तोटे? जाणून घ्या तज्ञांचा...

egg yolk: अंड्यामधील पिवळे बलक खाल्ल्याचे फायदे की तोटे? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

मुंबई : प्रथिनांच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक असलेल्या अंड्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी २, बी १२, व्हिटॅमिन ए, डी, आयोडीन, सेलेनियम, बायोटिन, फॉस्फरस, जस्त यांसारखे अनेक पोषक घटक असतात. स्नायू मजबूत करण्यासोबतच अंडी खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते, परंतु अंडं खाण्याबद्दल लोकांच्या वेगवेगळ्या मान्यता आहेत. काही लोक संपूर्ण अंड खातात तर काही लोक अंड्याचं पिवळं बलक काढून फक्त पांढरा भागच खातात. शरीरासाठी महत्वाचे असणारे घटक अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये आढळतात. त्यामुळे अंडं कसं खावं किंवा त्याचा शरीराला फायदा काय ? जाणून घ्या यावर तज्ञ काय म्हणतात.

तज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शरीरासाठी महत्वाचे घटक जसे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ओमेगा -३ फॅटी ॲसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स अंड्यातील पिवळ बलकमध्ये आढळतात. अंड्यातील पिवळ्या भागात जास्त प्रमाणात फॅट असते आणि त्याचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकते, त्यामुळे दिवसातून फक्त एकदा अंड्यातील पिवळे बलक खाणे चांगले.

अंड्यातील पिवळ बलक खाण्याचे फायदे:

  • अंड्यातील पिवळं बलक व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम यांसारख्या महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे.
  • अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये कोलीन असते, जे मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यांसाठी आवश्यक असते.
  • तसेच हे डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात.
  • अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये असलेल्या निरोगी चरबीमुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते, जे मर्यादित प्रमाणात खाल्ले तर वजन नियंत्रणात मदत होते.
  • पिवळ बलक हा उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे जो दिवसभर ऊर्जा प्रदान करू शकतो.
  • त्यामध्ये निरोगी फॅट्स असतात जे एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात.
  • अंड्यातील पिवळ बलकमधील असलेले व्हिटॅमिन डी कॅल्शियमचे शोषण करण्यास मदत करते आणि हाडे मजबूत करते.
  • अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स त्वचेची लवचिकता वाढवू शकतात आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करू शकतात.

अंड्यातील पिवळ बलक न खाण्याचे कारण

  •  अंड्यातील पिवळ बलक आहारातील कोलेस्टेरॉलमध्ये जास्त असते, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते व त्यामुळे हृदयविकार होऊ शकतो.
  •  ज्या लोकांना अंड्याची ऍलर्जी आहे त्यांना अंड्यातील पिवळ बलक खाल्ल्याने समस्या वाढू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -