Sunday, May 5, 2024
Homeमहत्वाची बातमीDevendra Fadnavis : राज ठाकरे मोदींना पाठिंबा देतील!

Devendra Fadnavis : राज ठाकरे मोदींना पाठिंबा देतील!

मनसेच्या पाडवा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युतीच्या (MNS-BJP Alliance) चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीच्या (Mahayuti) महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांचीही भेट घेतली. भाजपच्या नेत्यांचीही राज ठाकरेंबाबत स्वागतार्ह भूमिका आहे. त्यामुळे मनसे महायुतीत सामील होणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले. मात्र, राज ठाकरे यांनी अद्याप या युतीबाबत कोणतंही भाष्य केलं नाही. उद्या त्यांनी सर्व मनसैनिकांना शिवतीर्थावर येण्याचं आवाहन केलं असून यावेळी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज ठाकरेंबाबत भाष्य केलं आहे.

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मनसे युतीच्या चर्चेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेसोबत गेल्या काही काळात चर्चा झाली आहे. मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यावर त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी २०१४ मध्ये मोदींजींना समर्थन दिलं होतं. मोदीजी पंतप्रधान व्हावे, अशी राज ठाकरेंची इच्छा होती. त्यामुळे राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा द्यावा ही अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मनसे राज ठाकरेंचा पक्ष आहे, त्यासाठी त्यांना विचार करावा लागेल. पण, राज ठाकरेंना देखील आज हे मान्य असेल की, पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षात जो विकास केला आहे त्यामुळे नवीन भारताची निर्मिती झाली आहे. अशा परिस्थितीत सर्व लोकांनी मोदींच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. ज्यांच्यासाठी समाज आणि राष्ट्र प्रथम आहे, अशा विचाराने प्रेरित सर्व लोकांनी मोदींसोबत राहायला हवं. मला विश्वास आहे की, राज ठाकरे आणि मनसे पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. मला अपेक्षा आहे की, राज ठाकरे यावेळी मोदींना पाठिंबा देतील, असं फडणवीसांनी म्हटलं आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -