Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीCancer: कॅन्सरपासून बचाव करतात हे ५ पदार्थ, डाएटमध्ये नक्की करा समावेश

Cancer: कॅन्सरपासून बचाव करतात हे ५ पदार्थ, डाएटमध्ये नक्की करा समावेश

मुंबई: कॅन्सर एक जीवघेणा आजार आहे. याची कारणे अनेक आहे. मात्र या आजाराचा धोका वाढवण्यामध्ये खराब खाण्यापिण्याच्या सवयी आणि फिजीकल अॅक्टिव्हिटीमध्ये कमतरता या गोष्टी कारणीभूत ठरतात. दरम्यान, संतुलित आहार शरीलाला योग्य प्रकारे पोषण देतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. पोषणयुक्त आहारामुळे शरीराला आवश्यक ती व्हिटामिन, खनिजे,फायबर मिळतात जे कॅन्सरविरोधात लढण्यास मदत करतात.

स्वस्थ जीवनशैलीचा वापर करून आपण कॅन्सरपासून बचाव करू शकतो. दरम्यान पौष्टिक आहार संपूर्ण सुरक्षेची गॅरंटी देत नाही. मात्र निश्चितपणे कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करते.

खाली असे काही ५ पदार्थ आहेत जे कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.

हिरव्या भाज्या

ब्रोकोली, फ्लॉवर, ब्रसेल्स स्पाऊट्स सारख्या हिरव्या भाज्या आपल्या शरीराला पौष्टिकता प्रधान करतात. अँटी ऑक्सिडंट आणि फायटोकेमिकल्सने भरपूर भाज्या स्तन तसेच प्रोस्टेट कॅन्सरह विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करतात.

बेरीज

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी तसेच रसरशीत बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तणावाशी लढण्यात मदत होते. नाश्त्यामध्ये मूठभर बेरीज खाल्ल्याने याचा बराच फायदा होतो.

हळद

हळदीमध्ये करक्युमिन नावाचे तत्व असते. कर्क्युमिन कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखण्यास मदत करता. त्यामुळे जेवणात नेहमी हळदीचा समावेश करा.

फॅटी फिश

सॅलमन अथवा बांगडासारख्या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळते. कॅन्सरचा धोका कमी करण्यात या फॅटी अॅसिडचा मोठा वाटा आहे. त्यामुळे माशांचे सेवन जरूर करावे.

लसूण

तुमच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणीचा वापर आहारात केला जातो. मात्र लसूण खाल्ल्याने बरेच फायदेही मिळतात. यातील घटक कॅन्सरविरोधी भूमिका निभावण्यास मदत करतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -