Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाU19 World Cup 2024: सलग ६ सामने जिंकत फायनलमध्ये पोहोचली टीम इंडिया,...

U19 World Cup 2024: सलग ६ सामने जिंकत फायनलमध्ये पोहोचली टीम इंडिया, असा होता प्रवास

मुंबई: भारतीय संघ अंडर १९ वर्ल्डकप २०२४मध्ये फायनलमध्ये पोहोचला आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला २ विकेटनी हरवले. या पद्धतीने भारत सलग पाचव्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. उदय सहारणच्या नेृत्वात भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध आपले अभियान सुरू केले होते. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला ८४ धावांनी हरवले होते. बांगलादेशविरुद्ध सुरू झालेला विजयाचा प्रवास हा सुरूच होत.

या स्पर्धेत असा राहिला भारताचा प्रवास

बांगलादेशनंतर भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात आयर्लंडला हरवले. त्यांनी आयर्लंडच्या संघाला २०१ धावांनी हरवले. यानंतर टीम इंडियासमोर अमेरिकेचे आव्हान होते. मात्र अमेरिकेचा संघ उदय सहारणच्या नेतृत्वातील संघासमोर टिकू शकला नाही. भारतीय संघाने चौथ्या सामन्यात न्यूझीलंडला हरवले. भारताविरुद्ध न्यूझीलंडला २१४ धावांनी पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंडनंतर त्यांनी नेपाळला हरवले.

सेमीफायनलमध्ये आफ्रिकेला हरवत गाठली फायनल

भारतीय संघाने सेमीफायनलच्या सामन्यात आफ्रिकेला दोन विकेट राखून हरवले. आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान २ विकेट आणि ७ बॉल राखत पूर्ण केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -